
अकोला प्रतिनिधी :
श्रावण महिन्यातील ऐतिहासिक कावड-पालखी महोत्सवात यंदा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. मध्य भारतातील सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा हा महोत्सव अकोल्यात भक्तिमय वातावरणात साजरा होत असताना, आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कावडधारी भक्तांचे तसेच कावड व पालखी मंडळाच्या अध्यक्षांचे स्वागत करून सामाजिक-धार्मिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला.
महेंद्र डोंगरे यांच्या पुढाकाराने स्वागत मंच
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांच्या पुढाकाराने कावडधाऱ्यांसाठी विशेष स्वागत मंच उभारण्यात आला. शहराच्या विविध भागांतून आलेल्या शिवभक्तांचे आणि कावड-पालखी मंडळाच्या अध्यक्षांचे पुष्पहार व घोषणाबाजीने स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे आघाडीची जनतेशी असलेली जवळीक आणि संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली.
पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
या स्वागत सोहळ्यास जिल्हा व महानगरातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यात –
मिलिंद इंगळे (जिल्हा महासचिव),
मजहर भाई (महानगराध्यक्ष),
वंदनाताई वासनिक (महानगर अध्यक्षा),
गजानन गवई (महासचिव),ज्योती खिल्लारे, मनोहर बनसोड, सरोजताई वाकोडे, सतीश चोपडे, संतोष किर्तक, प्रदीप पळसपगार, डॉ. राजुस्कर, संजय किर्तक, शंकरराव इंगोले, अमोल कलोरे, इंगळे ठेकेदार आदींचा समावेश होता.
तसेच कार्यकर्त्यांमध्ये मारोती वासनिक, प्रकाश पाटील, कुणाल शेंडे, अक्षय डहाके, साजन शेंडे, प्रज्वल मेश्राम, धीरज गणवीर, आशिष मेश्राम, पियुष घोडस्वार, आर्यन मेश्राम,अमोल उके,प्रथमेश मडामे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.
👉 या उपक्रमाद्वारे वंचित बहुजन आघाडीने दाखवून दिले की, धार्मिक-सामाजिक परंपरांमध्ये जनतेसोबत राहून कार्य करण्याची आघाडीची परंपरा आजही ठाम आहे.
कावड-पालखी महोत्सवाने केवळ श्रद्धेचे नव्हे, तर जनतेच्या विश्वासाचे प्रतीक म्हणूनही या उत्सवात आघाडीची छाप सोडली.