
अकोला (प्रतिनिधी) | शहरातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना चाप बसवित, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या डि.बी. पथकाने एक मोठी कामगिरी बजावली आहे. गुप्त माहितीनंतर पोलिसांनी एक मोटारसायकल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून एकूण चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून, या वाहनांची एकूण किंमत अंदाजे ₹1,25,000/- आहे.दि. १८ मार्च २०२५ रोजी मतीन अहमद खान (वय ६३, रा. आयशा प्लाझा, टिळक रोड, अकोला) यांनी त्यांची अॅक्टिव्हा (MH-30-AK-3238) चोरी गेल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार कलम ३०३(२) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास दरम्यान डी.बी. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ईस्तीयार खान ईलीयास खान (वय २६, रा. फिरदौस कॉलनी, अकोला) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून सदर अॅक्टिव्हा हस्तगत करण्यात आली.तपास पुढे जाताच, आरोपीच्या मुसक्या आवळताना रामदासपेठ पोलीस ठाण्यात दाखल खालील गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग उघड झाला:अप.क्र. 147/2024, कलम 379 भादंवि – हिरो होंडा स्प्लेंडर (MH-30-BR-4351) – ₹40,000अप.क्र. 159/2025, कलम 303(2) भा.दं.वि. – अॅक्टिव्हा (MH-30-Z-6173) – ₹40,000अप.क्र. 229/2025, कलम 303(2) भा.दं.वि. – अॅक्टिव्हा (MH-30-AR-0452) – ₹30,000या सर्व चारही मोटारसायकली मिळून एकूण अंदाजे ₹1.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय गवई यांच्या नेतृत्वात सहा. पोउनि. महेंद्र बहादुरकर, पोहवा. अश्विन सिरसाट, पोहवा. अजय भटकर, पोहवा. ख्वाजा शेख, पोहवा. किशोर येउल, पोकॉ. निलेश बुंदे व पोकॉ. शैलेश घुगे यांनी केली.गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा. अश्विन सिरसाट करीत आहेत.