रंजित वाघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे वेळीच भान – माणुसकीचा झरा पुन्हा वाहता झाला…
अकोट (प्रतिनिधी) :
काल रात्री ८ वाजता सुमारास अकोट-अकोला मार्गावर ऊगवा फाट्यानजीक रस्त्यावर अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या एका निष्पाप हरणीला भरधाव मोटारसायकलची धडक बसली. दुर्दैव असे की, वाहनचालक न थांबता तिथून निघून गेला.
मात्र… नशिबाने त्या हरणीच्या वाट्याला प्रफुल्ल वाघ यासारखा संवेदनशील साक्षीदार लाभला. डोळ्यादेखत घडलेला प्रसंग पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रवक्ता रंजित वाघ यांना फोन करून माहिती दिली.
रंजित वाघ यांना ही घटना केवळ एक फोन कॉल वाटली नाही… ती त्यांच्यासाठी एक माणुसकीची साद होती, संवेदनशीलतेने ते आपल्या सहकाऱ्यांसह – मनोज वंजारी आणि योगिता वंजारी – घटनास्थळी धावले.
पोलिस व वन विभागाशी तातडीने संपर्क साधण्यात आला. अकोट फैल पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे तायडे सर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आवारे साहेब व इंगोले साहेब यांना रेस्क्यूसाठी तातडीने पाठवले.
वन विभागाच्या प्रयत्नांनी हरणीला योग्य उपचारासाठी हलविण्यात आले.
या वेळी रंजित वाघ, प्रफुल्ल वाघ, मनोज वंजारी, योगिता वंजारी, अकोट फैल पोलिस स्टेशनचे अधिकारी व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.




