वंचितांचा प्रकाशवर बातमी झळकताच झोपलेलं प्रशासन जागं झालं!

अकोला-अकोट रेल्वे उड्डाणपूलवरील जीवघेण्या खड्ड्यांवर काम सुरू, पण नागरिकांची ठाम मागणी – “फक्त खड्डे नाही, रस्ताच नवा हवा!”

अकोला (प्रतिनिधी):
अकोला-अकोट रेल्वे उड्डाणपूल मार्गावरील गंभीर आणि धोकादायक स्थितीचा ‘वंचितांचा प्रकाश’ने घेतलेला समाचार प्रशासनाच्या झोपेचं बोट धरून त्यांना जागं करून गेला! गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मोठाले, खोल, जीवघेणे खड्डे निर्माण झाले होते. काही खड्डे तर इतके खोल होते की त्यातून अपघात होणं केवळ शक्यता नव्हे, तर वेळेचा प्रश्न बनला होता.

या मुद्द्यावर ‘वंचितांचा प्रकाश’ने १० जुलै रोजी थेट, संतप्त आणि सामाजिक भान ठेऊन बातमी प्रसिद्ध केली होती –
“अकोट रोडवर जीवघेणा धोका! रस्त्यावर गड्डे की मृत्यूचे सापळे?”

या बातमीनंतर प्रशासनाचे डोळे उघडले आणि खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले. मात्र नागरिक यावर समाधानी नाहीत.

📢 लोकांची मागणी – “हे फक्त मलमपट्टी! रस्ताच नवीन करा!”
नागरिकांचा ठाम आक्रोश आहे की, केवळ खड्डे बुजवून हा प्रश्न सुटणार नाही.

“जेव्हा गड्डे पडले तेव्हा झोपलं, आता फक्त बुजवून स्वतःची जबाबदारी संपवणार?”

या रस्त्यावरून रोज हजारो दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत फक्त तात्पुरती दुरुस्ती ही केवळ अपघाताचं आमंत्रण आहे, असं स्थानिकांनी स्पष्ट केलं आहे.

🛠️ प्रशासनाचं काम सुरू – पण लोकांचा दबाव कायम!
खड्ड्यांवर काम सुरू असलं तरी प्रशासनाने संपूर्ण रस्त्याचं डांबरीकरण करण्यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेकडून केली जात आहे.


‘वंचितांचा प्रकाश’ आपल्या सामाजिक भानातून अशीच सत्य परिस्थिती पुढे आणत राहील, जोपर्यंत रस्ते सुरळीत, सुरक्षित आणि अपघातमुक्त होत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published.