अकोला, दि. ३० (प्रतिनिधी) : अकोल्यातील जिल्हा महिला व बालविकास कार्यालय आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष हे दोन्ही कार्यालय आता नव्या वास्तूत स्थलांतरित झाले असून, दिनांक १ जुलैपासून तेथूनच कामकाज सुरू होणार आहे.
नवीन कार्यालय ‘महिला व बालविकास भवन’ या नावाने ओळखले जाणार असून, हे भवन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाजवळ व श्री संतोषी मातेच्या देवळालगत स्थित आहे. याआधी ही कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यरत होती.
संबंधित नागरिक, संस्थांनी नव्या पत्त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.
— टीप: कोणत्याही महिला व बालकल्याणाशी संबंधित सेवा, अर्ज किंवा चौकशीसाठी आता नव्या कार्यालयात संपर्क साधावा.