
अकोला, दि. 11 मे (प्रतिनिधी):
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोल्यात तुफानी तिरंगा रॅली काढण्यात आली. देशातील युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी व बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा न करता रॅलीद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
सकाळी 9 वाजता टॉवर चौक येथील पक्ष कार्यालयातून निघालेली ही तिरंगा रॅली जयघोषांच्या गजरात शहरभर दिमाखात मार्गक्रमण करत “भारतीय सैन्याचा विजय असो”, “जय भारत”, “भारत जिंदाबाद” अशा राष्ट्रभक्तीने भारलेल्या घोषणांनी आकाश दणाणून सोडले.
रॅलीचा समारोप शहीद स्मारक येथे झाला. तेथे माजी सैनिक आतिष शिरसाट यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वीर शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सैनिकांना सलामी दिली गेली.
या रॅलीचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी केले. यावेळी विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपस्थित प्रमुखांमध्ये पी. जे. वानखडे गुरूजी, संगीताताई अढावू, श्रीकांत घोगरे, इंजि. धीरज इंगळे, प्रभाताई शिरसाट, मजहर खान, ज्ञानेश्वर सुलताने, सुनिल फाटकर, मेश्रामताई, अनुराधा ठाकरे, वंदनाताई वासनिक, किशोर जामणिक, पवन बुटे, राहुल आहिरे, विकास सदांशिव, सचिन शिराळे, आकाश शिरसाट, संजय पाटील, बाबारावजी बागडे, निताताई गवई, मिनाताई बावणे, रामकुमार गव्हाणकर, विजया शुक्लोधन वानखडे, संजय बावणे, मनोहर बनसोड, वैभव खडसे, आनंद डोंगरे, चरणसिंग चव्हाण, बबलु शिरसाट, शरद इंगोले, गजानन दांडगे, जय रामा तायडे, मंगला शिरसाट आदींचा समावेश होता.
रॅलीत महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. तिरंगा हातात घेऊन देशप्रेमाच्या भावनेने भरलेल्या या रॅलीने अकोल्याच्या रस्त्यांवर देशभक्तीची चळवळ उभी केली.