स्थानिक/अकोला.श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी महात्मा फुले बोलतोय एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे प्रमुख पाहुणे प्रा.पुंडलिक भामोदे, प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले जेष्ठ नाट्यकर्मी प्रा. मधु जाधव डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे संचालक डॉ संजय तिडके, विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. नितीन मोहोड मानव्यविद्या शाखाप्रमुख डॉ. नाना वानखडे,सामाजिक न्यायपर्वा चे समनव्यक डॉ संजय पोहरे प्रबंधक श्री राजेश गीते कार्यक्रमाचे समन्वयक प्रा डॉ गजानन वजीरे उपस्थित होते

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ पंजाबराव देशमुख तिन्ही महामानवांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.प्रा. पुंडलिक भामोदे यांनी मी महात्मा फुले बोलतोय या एकपात्री प्रयोगातून महात्मा फुले यांच्या महान कार्य व त्यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली.प्रा मधू जाधव यांनी महात्मा फुलेंनी त्याकाळी शिक्षणासाठी कशाप्रकारे योगदान दिले व आजची शैक्षणिक परिस्थिती याबद्दल आपले मत प्रगट केलेअध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे यांनी महात्मा फुले यांनी शैक्षणिक कार्यामध्ये कशाप्रकारे सावित्रीबाई फुले यांना सामावून घेतले व मुलींची पहिली शाळा सुरू केली याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गजानन वजीरे यांनी केले संचालन कुमारी पायल मोडक यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अश्विनी बलोदे यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
