
पातुर तालुक्यातील प्रहार बहुउद्देशीय संस्था, आस्टूल यांच्या कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाचे जनक, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या थोर समाजसुधारकाच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय संघटक अंकुर साहित्य संघाचे श्री. देवानंदजी गहिले यांनी भूषविले. त्यांच्यासोबत राज्योंनतीचे जिल्हा प्रतिनिधी श्री. संतोष उपर्वट आणि रिपब्लिकन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे व प्रहार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. अमोल करवते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पुष्पहार अर्पण, अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलन करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या कार्याची आठवण करून देणारे विचार उपस्थितांनी मांडले.या कार्यक्रमात रत्नदीप उपर्वट, ऋषिकेश इंगळे, वैभव राऊत, गणेश गोळे, विजय रोम, आदित्य अवचार, संग्राम इंगळे, महेश राऊत, सोबत राऊत आणि देवेंद्र पोहरे हे मान्यवर देखील उपस्थित होते. त्यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून जयंती उत्सवात आपला सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना महात्मा फुले यांच्या कार्य, विचारधारा आणि त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या माध्यमातून तरुण पिढीला सामाजिक समतेचा आणि शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेण्याचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी झाले. संपूर्ण वातावरणात एक सामाजिक जागृतीची भावना निर्माण झाली होती.-