श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखेच्या शिरपेचात मानाचा तुरा..!

शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला NMMS 2024- 25

महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या NMMS 2024 -25 मध्ये आयोजित केलेल्या परीक्षेमध्ये अकोला शहरातील सर्व नामांकित शाळेमधून एकूण 25 विद्यार्थी पास झाले असून त्यापैकी 16 विद्यार्थी श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखेचे होते.

सदर परीक्षेची निवड यादी नुकतीच जाहीर झाली असून अकोला शहरांमधील सर्व नामांकित शाळेमधून एकूण 10 विद्यार्थी प्रवीण्य श्रेणीमध्ये आले असून त्यापैकी 5 विद्यार्थी हे श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखेचे आहेत. प्राविण्यश्रेणीत आलेले विद्यार्थ्यांमध्ये महालक्ष्मी चव्हाण, तक्षक डोंगरे, सय्यद अफान सय्यद रफिक, भक्ती प्रमोद बोर्डे, शिव प्रेमपाल सिनसिनवार यांचा समावेश आहे.

या सर्वांचे श्रेय मुख्याध्यापक विजय ठोकळ यांनी केलेले परीक्षेचे नियोजन , NMMS ला शिकविणारे सर्व शिक्षक व शिक्षिका यांना जाते. करिता मुख्याध्यापक व NNMS ला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.