शहरातील गुंड प्रवृत्तीचे ०२ सराईत आरोपी हद्दपार

अकोला शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच विवीध प्रकारचे वारंवार गुन्हे करणा-या ईसमांवर कायदयाचे धाक रहावे याकरीता पोलीस अधीक्षक श्री. बच्चनसिंह साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. अभय डोंगरे साहेब यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन पो.स्टे. खदान. ह‌द्दीतील १) प्रशिक राजेश जावळे वय २३ वर्ष रा. जेतवन नगर धोबी खदान, अकोला, २) अक्रम बेग ईमाम बेग वय ३३ वर्ष रा. ईस्लाम चौक, झिराबावडी, खदान, अकोला या आरोपी विरूध्द दाखल गुन्हयांचे स्वरूप पाहता त्यांचे विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये अकोला जिल्हयातून हद्दपार करण्या बाबत प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, अकोला यांचे कडे सादर करण्यात आला होता.

त्यानुसार उपविभागीय दंडधिकारी, अकोला यांचे आदेशान्वये उपरोक्त वर नमुद ०२ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ईसमांना अकोला व बाळापुर तालुक्यातुन सहा महिण्याकरीता ह‌द्दार करण्यात आले आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चनसिंह साहेब यांनी अकोला आगामी सण-उत्सव काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी या करीता अश्या प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचे ईसमांची माहिती संकलीत करण्याचे आदेश दिले असुन त्यांचे विरूध्द वरील प्रमाणे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.