अकोला शहर अती संवेदनशिल म्हणुन ओळख आहे शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा तसेच गुढीपाडवा, चेट्रीचंड (झुलेलाल जयंती) रमजान ईद, श्रीराम नवमी, महाविर जयंती, श्री. हनुमान जयंती हे उत्सव शांततेत व निर्भिड वातावरणात पार पडावे याकरीता दि.२९.०३.२०२४ रोजी सायंकाळी १७.३५ ते १९.०० वा पावेतो मा. श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक सा. अकोला यांचे मार्गदर्शनाखाली शहरातुन खालील मार्गाने रूटमार्च घेण्यात आला आहे.
रूटमार्च मार्ग :- चांदखा प्लॉट येथुन प्रारंभ होवुन हरिहरपेठ, किल्ला चौक, जयहिंद चौक, दगडीपुल चौक, लक्कडगंज, माळीपुरा चौक, अकोट स्टॅण्ड चौक, सुभाष चौक, तेलीपुरा चौक, ताजनापेठ फतेह चौक, चांदेकर चौक, गांधी चौक मार्गे कोतवाली चौक पर्यंत.
सदर रूटमार्च मध्ये, मा. श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक सा. अकोला, श्री. सतिश कुलकर्णी उप विभागीय पोलीस अधिकारी श.वि. अकोला यांचेसह २० अधिकारी, १४० अंमलदार, 03 R.C.P. प्लाटुन, SRPF 4 प्लाटुन, तसेच वज्र वाहन, दंगाकाबु वाहन, २फिरते सीसीटीव्ही मोबाईल व्हॅन, दामीनी पथक सहभागी झाले होते.


