श्री शिवाजी महाविद्यालयात २५ मार्च रोजी राज्यस्तरीय सेमिनार स्पर्धेचे आयोजन..

स्थानिक /अकोलाश्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला मानव्यशास्त्र आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या वतीने २५ मार्च रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय सेमिनार स्पर्धेचे आयोजन. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तर मुख्य आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे स्पर्धेचे समन्वयक डॉ. आनंदा काळे यांच्या नेतृत्वात सेमिनार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातील स्पर्धेसाठी यु.जी.आणि पी.जी.विद्यार्थ्यांसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या स्पर्धेचे विषय १)भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी प्रवास २) जागतिकीकरणाचा भारतीय शेतकऱ्यांवर होणारा परिणाम.३) विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकाससात कला, वाणिज्य, क्रीडा ,साहित्य व संगीताचे योगदान.४) कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी जीवनावर होणारे परिणाम.हे राहतील सामाजभिमुख विषयावर मत मांडणार विद्यार्थी वर्ग या सेमिनार स्पर्धेचे बक्षीसचे स्वरूप हे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व खालील प्रमाणे रोख रक्कम राहील• प्रथम पारितोषिक: रु. १०,००१/- आणि स्मृतिचिन्ह• द्वितीय पारितोषिक: रु. ७,००१/- आणि स्मृतिचिन्ह• तृतीय पारितोषिक: रु. ५००१/- आणि स्मृतिचिन्ह• प्रोत्साहनपर बक्षिसे: रु. १०००,५००,५००,५००,५००दि २२ मार्च पर्यंत खालील लिंक द्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन महाविद्यालयाच्या मानवविद्या शाखेचे प्रमुख डॉ.नाना वानखडे वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे प्रमुख डॉ.संजय तिडके असे महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.