पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला यांची धडक कार्यवाही जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस?

पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला येथे दि. १४/०३/२०२५ रोजी फिर्यादी नामे आत्माराम बाळकृष्ण कटयारमल वय ३६ वर्ष, रा. वखाणा ता. संग्रामपुर जि. बुलठाणा यांनी फिर्यादी दिली की, दि. १४/०३/२०२५ रोजी चे ०१/३० वा. वे सुमारास दुर्गा चौक अकोला येथुन सिटी हॉस्पीटल येथे पायी जात असतांना मला एका अनोळखी इसमाने वय अंदाजे २० ते २२ वर्ष असलेला काळा सावळया रंगाचा यांने त्यांचे काळया रंगाचे स्कुटीवर आला व मला म्हणाला की मी ती कडेच जात असल्याने मी तुम्हाला सोडुन देतो माझे गाडीवर बसा असे म्हटल्याने माझा विश्वास बसल्याने मी त्यांचे काळया रंगाचे गाडीवर बसलो असता त्यांने मला सिटी हॉस्पीटल च्या गल्लीत नेले व माझी एकदम गचंडी पकडुन ओठत ओठत एका अपार्टमेन्ट च्या सर्विस गल्लीमध्ये नेले व माझे खिशातुन ७८००/रु जे मी माझे भावांचे इलाजा करीता आणले होते ते बळजबरीने धाक दाखवुन हिसकावन घेतले अशा फिर्याद वरून पोस्टे रामदासपेठ अकोला येथे अप.न.९१/२०२५ कलम ३०९ (४) बि.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

सदर गुन्हयांचे तपासामध्ये प्रतिबंधक पथक यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारचे माहीतीवरून अकोट फैल अकोला येथे राहणारा एका विधी संघर्ष बालक यास विचारपुस केली असता त्यांने सदरचा गुन्हा व दि. १३/०३/२०२५ रोजी सुध्दा डॉ. केळकर यांचे हॉस्पीटल च्या बाजुला असलेल्या गल्लीत एका म्हतारे आजोबा यांचे कडुन सुध्दा २०००/रू बळजबरीने हिसकावुन घेतले बाबत कबुली दिल्याने त्यांचे जवळुन गुन्हयातील बळजबरीने हिसकावुन घेतलेले ९८००/रूव एक एक्सेस कंपणीची काळ्या रंगाची मोसा क्रमांक MH 30 AU8173 कि.अ.६०,०००/रू असा एकुन ६९,८००/रू चा मुददेमाल जप्ती जप्त करण्यात आला. तसेच पोस्टे सिव्हील लाईन येथील दाखल अप.न.२७/२५ कलम ३०३ (२) बि.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल गुन्हा मी व माझ्झा मित्र राज संतोष खंडारे वय २० वर्ष, रा. आंबेडकर नगर अकोला केला असल्याची कबुली दिली. वरून पोस्टे रामदासपेठ येथील जबरी चोरीचे दोन गुन्हे व पोस्टे सिव्हील लाईन येथील एक गुन्हा उघड करण्यात आला.

सदरची कामगीरी श्री बच्चन सिंग पोलीस अधिक्षक अकोला, श्री अभय डोंगरे अपर पालीस अधिक्षक, श्री सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री मनोज बहुरे पोलीस निरीक्षक रामदासपेठ यांचे मार्ग दर्शनाखली सपोनि गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, प्रदीप जोगदंड, पो. हवा. शेख हसन शेख अब्दुल्ला, पो.कॉ. श्याम मोहळे, संतोष गवई, अनील भातखडे सर्व नेमणूक रामदापेठ, अकोला यांनी केलेली.

Leave a Reply

Your email address will not be published.