अकोला पोलीस दलात मुलभुत सुविधेसह प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर…

अकोला जिल्हा पोलीस दलाचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, (भा.पो.से.) यांचे प्रयत्नातुन जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडल मर्यादित मुंबई यांचे मान्यतेने नविन प्रशासकीय इमारतीचे व निवासी निवासस्थानाचे पायाभुत सुविधासह सर्व संबंधीत कामे, नविन पोलीस चौकीच्या निमिर्तीसाठी होत असलेल्या प्रयन्नाबाबत, पोलीस विश्रामगृहाचे अद्यावतीकरण करणे बाबत व महीला पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे करीता नविन प्रसाधनगृह / महीला विश्श्रामगृह निर्मीती बाबतची कामे करण्यात आलेली असुन काही कामे प्रगतीपथावर आहेत. ती खालील प्रमाणे.

पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे निवासस्थान/वसाहतः-

अकोला शहरातील दक्षता नगर येथे पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे करीता नविन निवासस्थानाचे बांधकाम दिनांक २६/११/२०२४ पासुन सुरु असुन पोलीस अधिकारी यांचे एकुण ३० निवासस्थाने व पोलीस अंमलदार यांचे एकुण २१६ असे एकुण २४६ निवासस्थानांचे बांधकाम सुरु आहे. तसेच पोलीस स्टेशन रामदास पेठ, स्टेशन जुने शहर, पातुर, उरळ, बोरगांव मंजु येथे व पोलीस बाळापुर येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकमा करीता व निवासी निवासस्थाने बांधकाम करण्यास मान्यता मिळालेली आहे. पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या निवासस्थाना करीता अकोट शहर, हिवरखेड, दहीहांडा, तेल्हारा, बाळापूर, पातूर व रामदासपेठ येथे नवीन सुसज्ज व सर्व सोई-सुविधायुक्त नवीन इमारतींचे प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्यात आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन चे नवीन सुसज्ज इमारती बाबतः-

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, बाळापूर, अकोट तसेच पोलीस स्टेशन अकोट शहर, अकोट ग्रामीण, हिवरखेड, मुर्तीजापूर शहर, मुर्तीजापूर ग्रामीण या कार्यालयांचे सुसज्ज नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला यांचे कडून मंजूरी साठी सादर करण्यात आले आहे.

नवीन पोलीस चौकी इमारत बाबतः-

अकोला जिल्हा पोलीस दलातील नविन होत असलेल्या पोलीस चौकी त्यामध्ये सिव्हील लाईन अंतर्गत कृषी नगर पोलीस चौकी, पोलीस स्टेशन खदान अंतर्गत मलकापुर पोलीस चौकी, पोलीस स्टेशन सिव्हील लाईन अंतर्गत उमरी पोलीस चौकी, पोलीस स्टेशन उरळ अंतर्गत गायगांव डेपो येथे पोलीस चौकी व पोलीस स्टेशन रामदासपेठ अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय येथे पोलीस चौकी निर्माण करण्याबाबत कार्य प्रगती पथावर आहे.

महिला पोलीस अधिकारी /अंमलदार यांचे साठी विश्राम गृह व प्रसाधन गृहः-

अकोला जिल्हा पोलीस दलातील महीला अधिकारी व अंमलदार कर्तव्यावर असताना त्यांचे सोई व सुविधेकरीता प्रसाधनगृह / विश्रामगृहांची निर्मिती चे पोलीस स्टेशन अकोट शहर, पोलीस स्टेशन मुर्तिजापुर शहर चे काम पूर्ण झाले असुन, पोलीस स्टेशन बार्शिटाकळी, पोलीस स्टेशन एमआयडीसी येथील काम प्रगती पथावर आहे.

वरील प्रमाणे अकोला जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे साठी आधारभूत सुविधांचे बळकटीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे गतीमान प्रशासनाला आणखी गती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.