शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

स्थानिक श्री. शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषेच्या गौरवासाठी साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव्यविद्या शाखा प्रमुख डॉ.नाना वानखडे होते प्रमुख वक्ते प्रा. अनिल शेलकर तर प्रमुख उपस्थिती मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय पोहरे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंदा काळे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.पि.पी.देशमुख हे होते. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय पोहरे यांनी केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले. त्यानंतर डॉ. आनंदा काळे यांनी आपल्या मनोगतात म्हटले-“आज ग्रामीण भागातील शब्द संपत्ती नामशेष होते की काय, कारण एका कपाशीला त्यासंबंधीत अनेक शब्द आज नवीन पिढीला माहिती नाहीत, शेती संस्कृतीतील शब्द जपणे व आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे, त्यातूनच बोलणे” असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्त्ते प्रा. अनिल शेलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘साहित्य संमेलनातील आपले प्रत्यक्ष अनुभव कथन करून साहित्याचा आनंद घेणे ही सुद्धा एक साधनाच आहे’ असे मत व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘साहित्याचे प्रकार’ या नाटिकेचे अभिवाचन केले. यात मयुरी वहाने, साक्षी तायडे, वर्षा इंगोले , वृषाली वहिले, मेघा तायडे , कविता साखरे, विपुल लिंगोट, हर्षदिप अवचार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. श्रद्धा थोरात, डॉ. साधना कुलट,डॉ.रावसाहेब काळे, प्रा.आरती इंगळे प्रा. गणेश मेनकार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना राऊत तर आभार प्रदर्शन मयुरी वहाने हिने केले. यावेळी प्रा.आकाश हराळ,प्रा.संतोष पस्तापुरे डॉ.अनघा सोमवंशी, प्रा.अर्चना देशमुख, प्रा.ऋतुजा मुरेकर , प्रा. सोनवणे, प्रा. तेलगोटे, डॉ. उमेश घोडेस्वार, प्रा. सोळंके, प्रा. साबळे, प्रा. गवई व बहुसंख्य विद्यार्थी सोबत एम. ए. मराठीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.