
शिवाजी महाविद्यालय अकोला चे खेळाडू निखिल देवराज उके (60 kg) आणि वैभव लाला बुंदेले (60kg) यांनी श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संघात निवड झाली. आंतर विद्यापीठ स्पर्धा श्री शंकराचार्य युनिव्हर्सिटी ऑफ संस्कृत, केरळ येथे दि. 07/03/2025 ते 09/03/2025 या दरम्यान होणार आहेत. त्या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. एम. भिसे, श्री महादेव भुईभार ( माजी उपाध्यक्ष श्री शिवाजी संस्था, अमरावती) , श्री राजेश गीते (प्रबंधक),डॉ. नितीन मोहोड, डॉ मिलिंद बेलखडकर, प्रा संजय काळे( क्रीडा विभाग प्रमुख), प्रा. नितीन वाघमारे (क्रीडा शिक्षक) , श्री सुयश जडीये (प्रशिक्षक), श्री लाला बुंदेले तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.