
बिहार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्या संदर्भात बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना अकोला जिल्हाधिकारी मार्फत महाबोधी विहार मुक्त करण्यासंदर्भात निवेदन सादर केले असून निवेदनामध्ये बुद्धगयातील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करावे या ॲक्ट मुळे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापनामध्ये इतर धर्मियांची संख्या जास्त असल्यामुळे महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन योग्यरीत्या होत नसल्याने जगभरातील बुद्ध अनुयायांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्यामुळे महाबोधि महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्ध धर्मीयांच्या हाती देण्यात यावे व बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात येऊन जगभरातील व विदेशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्त करावा व तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे ही मागणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे सादर केली आहे या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे महिला आघाडी अध्यक्ष आम्रपालीताई खंडारे महासचिव संगीता ताई अढाऊ जि प माजी उपाध्यक्ष सुनिल पाटकर शहर महासचिव गजानन गवई, मनोहर बनसोड, किशोर जामणीक, पवन बुटे, दिनकर खंडारे, अशोक शिरसाट, आनंद डोंगरे, प्रदीप पळसपगार, डॉ राजुस्कर लक्ष्मीताई वानखडे, पराग गवई, नितीन सपकाळ, विकास सदाशिव, मोहन तायडे, प्रदीप शिरसाट, मंदाताई शिरसाट, रमाताई बागडे, प्रफुल विरघट, विश्वजीत इंगळे, सुनील शिरसाट, सुदर्शन शिरसाट, शीलवंत शिरसाट, बाबुराव भोजने, संजय बुध, अमोल जामनिक, रतन अंभोरे, विनोद खंडारे, प्रमोद हातोले, निलेश वाहुरवाघ, रामकृष्ण डोंगरे, सुयोग आठवले, अक्षय धांदे, डॉ अशोक मेश्राम, शुक्लोदान वानखडे, पुरुषोत्तम वानखेडे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
