
स्थानिक/अकोला
श्री.शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रम संस्कार शिबीराचे आयोजन ग्राम सोनाला येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन थाटात संपन्न झाला यावेळी उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष श्री शिवाजी संस्थेचे कार्यकारणी सदस्य तथा रासेयो समिती चे अध्यक्ष प्राचार्य डॉ केशवराव गावंडे,उद्घाटक म्हणून लाभलेले
श्री शिवाजी संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री सुरेशदादा खोटरे,प्रमुख पाहुणे म्हणून असलेले श्री शिवाजी संस्थेचे कार्यकारणी सदस्य प्रा.सुभाषजी बनसोड,प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त अभ्यास केंद्र संचालक प्रा.डॉ.संजय तिडके,महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. राजेश गीते,श्री.गोवर्धन होणाळे मंचावर उपस्थित होते.
उद्घाटन भाषण पर श्री सुरेशदादा खोटरे यांनी केले.

प्रा.सुभाष बनसोड यांनी विद्यार्थ्यांना जीवनात आनंदी राहण्याचे मूलमंत्र दिले
प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे यांनी विद्यार्थ्यांना रासेयो आपल्या जीवनात कसे महत्त्वाचे आहे या बद्दल विविध उदाहरण द्वारे माहिती दिली.अध्यक्ष प्राचार्य डॉ केशवराव गावंडे यांनी सांगितले की मन मनगट आणि मस्तिष्क साबुद ठेवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविककार्यक्रम अधिकारी प्रा सचिन भुतेकर यांनी केले,संचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.मयुरी गुड धे,तर आभार प्रदर्शन प्रा शुभम राठोड यांनी केले कार्यक्रमाला प्रा.डॉ प्राजक्ता पोहरे,प्रा रसिका पाटील ,अमरावती विद्यापीठ ब्रँड अँबेसिडर रोहन बुंदेले,शिबीर सहायक श्री शिवा रेळे, विद्यार्थी प्रतिनिधी सतिष अस्वार,विद्यार्थी प्रतिनिधीनी सायली गोतमारे,श्री संजय मोहोकार उपस्थित होते.
या शिबिर दरम्यान सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,महिला सक्षमीकरण, युवक मेळावा,कवी संमेलन, आरोग्य शिबीर,जनजागृती रॅली असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे असे महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.