
साप्ताहिक वंचितांचा प्रकाशाचा ३ रा वर्धापन दिन साजरा..
स्थानिक: अकोला(दि.१४ फेब्रु;२५)-
आज वंचितांचा प्रकाश हे साप्ताहिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होत आहे. नेहमीच सकारात्मक बातम्यांचा पाठपुरावा करून समाजात सकारात्मकता रुजवण्याचा प्रयत्न सातत्याने केले जाते. यामध्ये कार्यरत सर्व पत्रकार निर्भीडपणे सत्य समाजासमोर आणण्याचे काम करीत आहे. आजच्या भिषण काळात वृत्तपत्रांची देशाला गरज आहे. असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात प्रभात किड्स स्कूल अकोलाचे संस्थापक शिक्षणतज्ञ
डॉ. गजानन नारे यांनी वंचीतांच्या प्रकाशाच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.

14 फेब्रुवारी 2025 रोजी वंचितांचा प्रकाश या साप्ताहिकाचा तिसरा वर्धापन दिन शासकीय विश्रामगृह अकोला येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी, विशाल बोरे, दूरदर्शन प्रतिनिधी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य, डॉ. समाधान कंकाळ,
खुरेंद्र तिडके, समाज कल्याण अधीक्षक अकोला, अस्थिरोग तज्ञ डॅा. आशुतोष डाबरे, ढवळे ट्रॅक्टर चे संचालक पुष्कर ढवळे, भगत ज्वेलर्स चे संचालक, राहुल भगत, किरण डोंगरे, नितीन जामनिक, विष्णू डोंगरे, मेजर भगत उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक महेंद्र डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाची सखोल भूमिका मांडत २ पत्रकारांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ३० पत्रकार जोडण्यापर्यंत झाला असून आता नव्याने मोठ्या प्रमाणात या कार्याला गती देण्यात येणार असल्याचे ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना आशुतोष डाबरे यांनी वंचितांचा प्रकाश हे साप्ताहिक पुढल्या वर्षी याचे रूपांतर दैनिकात व्हावे अशी भावना व्यक्त केली.
डॉ. समाधान कंकाळ, मोहन येवले, खुरेंद्र तिडके, विशाल बोरे यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक विशाल नंदागवळी तर आभार प्रदर्शन ॲड. नितीन जामनिक यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल माहूरे, प्रा. ॲड.आकाश हराळ, ॲड. वैष्णवी हागोणे, सनी डोंगरे, कुणाल मेश्राम, शुभम गोळे, आदित्य बावनगडे, सचिन पाईकराव, नागसेन अंभोरे, सुमेध कांबळे, सुरज तायडे, प्रज्वल मेश्राम, अक्षय भालेराव, यांनी अथक परिश्रम घेतले.
