पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला यांची धडक कार्यवाही

आज दि. ०१/०२/२०२५ रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथील प्रतिबंधक पथक यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीचे आधारे अजहर फर्निचर दुकानाचे बाजुला, कागजीपुरा मजीद जवळ, अकोला येथे कार्यवाही केली असता आरोपी नामे मोहम्मद अन्सार मोहम्मद अबरार वय ३१ वर्ष, रा. रूखसार पैलवान चे घराजवळ हबीब नगर, खैर मोहम्मद प्लॉट, जुने शहर अकोला यांचे ताब्यातुन कत्तली करीता बांधुन ठेवलेले ०७ गोवंश जातीचे जनावरे एकुण कि.अ.१,७२,०००/-रूचा मुदेदमाल पंचासमक्ष घटणास्थळा वरून जप्त करण्यात करून पोस्टे. रामदासपेठ येथे अप.न. ५६/२०२५ कलम कलम ५, ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षणा कायदा सहकलम ११ प्रांण्याचा छळ प्रतिबंध अधि. सहकलम ३२५ भा. न्याय संहीता तसेच जप्त गोवंश जातीचे जनावरे पुढील संगोपण व देखरेख करिता आदर्श गोसेवा संस्था म्हैसपुर अकोला यांचे ताब्यात देण्यात आला.
सदरची कामगीरी मा. श्री. बच्चन सिंग सा. पोलीस अधिक्षक अकोला, श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधिक्षक, श्री सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री मनोज बहुरे पोलीस निरीक्षक रामदासपेठ यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा शेख हसन शेख अब्दुल्ला, पोहवा दादाराव टापरे पो.कॉ. श्याम मोहळे, रोशन पटले, पवन देशमुख सर्व नेमणुक रामदापेठ, अकोला यांनी केली.