अकोला, दि. 23 : भारत निवडणूक आयोगाकडून दि. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. दि. 25 रोजी शनिवार सुट्टीचा दिवस आल्याने आता दि. 24 जानेवारीला सर्व कार्यालयांत सकाळी 11 वा. शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘मतदान अनन्यसाधारण आहे, मी मतदान करणारच’ (नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर) ही थीम घेऊन मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत दि. 24 जानेवारी रोजी स. 11 वा. कार्यक्रमाचे आयोजन करून लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. सर्व कार्यालयांनी हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.