सराफा लाईन, सिटी कोतवाली, अकोला येथे “मॉक ड्रिल” चे आयोजन
अकोला शहरातील तसेच जिल्हयांतील नागरीकांनी जिल्हयात कोणत्याही ठिकाणी बॉम्ब स्फोटाचे अनुषंगाने सतर्क रहावे तसेच बॉम्ब बाबत सर्च ऑपरेशन कसे राबवावे, नागरीकांना सदर ठिकाणावरुन सुरक्षित कसे बाहेर काढायचे, यात नागरीकांना सुरक्षितता कशी प्रदान करायची त्याच प्रमाणे दहशतवादी कृत्य व बॉम्ब स्फोटाचे घटनांबाबत जनमानसात जनजागृती निर्माण व्हावी या करीता मा.श्री. बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक, अकोला, मा.श्री. अभय डोंगरे, अप्पर पोलीस अधीक्षक, अकोला तसेच मा.श्री. सतीश कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत दहशतवाद विरोधी शाखा, अकोला चे प्रभारी अधिकारी पो.उप.नि. संतोष तिवारी, त्यांचे शाखेतील पोलीस अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शंकर शेळके व त्यांचे पो. अंमलदार, पो.नि.श्री. राऊत, दहशतवाद विरोधी पथक, अकोला व त्यांचे पोलीस अंमलदार, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अकोला, आय. कार. युनिट, अकोला, पोलीस मुख्यालय, अकोला येथील RCP व QRT ची पथके आणि स्थानिक अकोला शहरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांचे पोलीस अंमलदार यांचे समन्वयाने दि.२२.०१.२०२५ रोजी दुपारी १३.१० वा. पासुन १४.१५ वा.पावेतो पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला चे हददीतील सराफा बाजार अकोला येथे ” अज्ञात इसमाने सराफा लाईन येथे बॉम्ब ठेवले असुन तो त्या बॉम्बचा सिरीयल ब्लास्ट करणार आहे असा कॉल नियंत्रण, अकोला येथे प्राप्त झाला आहे” असा बनाव करुन मॉक ड्रिल (रंगीत तालीम चे आयोजन करण्यात आले. सदर रंगीत तालीमी मध्ये सराफा बाजार, अकोला येथील लोकांना तेथुन सुखरुप बाहेर काढण्याचा तसेच BDDS पथकाकडील उपकरणे आणि श्वानाचे मदतीने संपुर्ण सराफा बाजार गल्लीची तपासणी करण्याचा सराव प्रभाविरित्या पार पाडण्यात आला.
सदर मॉक ड्रिल (रंगीत तालीम) मध्ये अकोला शहरातील एकुण ११ पोलीस अधिकारी तसेच ८० पोलीस अंमलदारांनी सहभाग घेवुन रंगीत तालीमी दरम्याने त्यांना दिलेले कर्तव्य त्यांनी उत्कृष्ठपणे पार पाडले.
सदर मॉक ड्रिल (रंगीत तालीम) प्रभावीरित्या व यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता मा. श्री. बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक, अकोला, मा. श्री. अभय डोंगरे, अप्पर पोलीस अधीक्षक, अकोला तसेच मा. श्री. सतीश कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन केले.



