शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढा

महाविद्यालयांना ‘समाजकल्याण’ची सूचना

शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असून, ते महाविद्यालयांनी तातडीने निकाली काढावे, अशी सूचना समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केली आहे. महाडीबीटी पोर्टलवर शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर 138, शैक्षणिक वर्ष 2022- 23 मध्ये 154, 2023-24 शैक्षणिक वर्षात 396 व शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 3 हजार 351 असे एकूण 4 हजार 39 अर्ज महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित आहेत. चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास 71 दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला असून प्रलंबित अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.