
स्थानिक: अकोला येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय ची खेळाडू कु. श्रेया रवी सुरलकर हिने राज्यस्तरीय शालेय किक बाॅक्सिंग स्पर्धेत सातारा मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. शालेय राज्यस्तरीय किक बाॅक्सिंग स्पर्धा दि. 15 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान श्रीमंत छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत उपांत्य फेरीत कोल्हापूर विभाग तर अंतिम सामन्यात नाशिक विभाग चा पराभव करत अंतिम सामना जिंकला.
त्या बद्दल महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, श्री राजेश गीते (प्रबंधक), प्रा. सुशीला मळसणे (कनिष्ठ विभाग प्रमुख), प्रा. गोविंद काळे (विज्ञान विभाग प्रमुख), श्री संजय काळे (क्रीडा विभाग प्रमुख), श्री नितीन वाघमारे (क्रीडा शिक्षक), अनंत पाचकवडे, संगीता सुरलकर (किक बाॅक्सिंग प्रशिक्षक) सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.