रमाई घरकुलासाठी 2 लाख 50 हजार रुपये शासन निर्णय लागु करावा , नितीन जामनिक यांचे सचिव यांना निवेदन .

अकोला : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या रमाई घरकुल आवास योजना व आदिवासी विकास विभाग अंतर्गत शबरी आवास योजना या योजनांच्या अनुदानामध्ये 1 लाख 20 हजार रुपये वरून वाढीव अनुदान 2 लाख 50 हजार रुपये करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय 4 ऑक्टोबर 2024 च्या बैठक क्रमांक 84 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. परंतु 4 महिने होउनही अद्याप महाराष्ट्र शासनाने या संदर्भात कोणताच शासन निर्णय काढला नसल्याने नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत,तरी 2025 या वर्षात जुन्या रक्कमेत घरकुल मंजूर न करता नवीन वाढीव अनुदानानुसार घरकुल मंजूरी करण्याचे आदेश देण्यासाठी तसेच यावर तात्काळ शासन निर्णय काढण्यासाठी डॉ. हर्षदिप कांबळे प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या माध्यमातून नितीन जामनिक यांनी निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.