तेल्हारा दि:- । राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिव संकल्प अभियानामध्ये या वर्षी २१०१ रक्तदानाचा संकल्प १६ जानेवारीला भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे आयोजित बैठकीत करण्यात आला. तालुक्यातील रक्तदात्यांची साखळी निर्माण करून गरजवंतांपर्यंत रक्त उपलब्ध करून देणे रक्तगट तपासणी करून जास्तीत जास्त संख्येने ब्लड ग्रुप पुस्तिका तयार करून सदर रक्तदात्यांची माहिती तालुक्यातील प्रत्येक गावात उपलब्ध करून देणे नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करणे जास्तीत जास्त रक्त साठा हा शासकीय रक्तपेढीत जमा करणे हजारो रक्तदान करणाऱ्या दात्यांची साखळी तयार करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत रक्तदान श्रेष्ठदान याबद्दल जनजागृती करणे, आपातकालीन परिस्थितीत तालुक्यातील प्रत्येक नागरिकांसाठी हक्काचे रक्तदाते तयार करणे आदी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रक्तदानाचा शिवसंकल्प अभियान राबविण्याचे आयोजन करण्यात आल्याचे शिव संकल्प अभियानांतर्गत आयोजित बैठकीमध्ये प्रास्ताविक करताना विकास पवार यांनी गेल्या दोन वर्षाचा लेखाजोगा वाचून आतापर्यंत किती रुग्णांना फायदा झाला व रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले आयोजित कार्यक्रमांमध्ये तेल्हारा शहरा सह तालुक्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी तसेच रक्तदाते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी सूचना देऊन मार्गदर्शन केले या वेळी भागवत भागवत मंगल कार्यालयाचे संचालक समाजसेवक प्रशांत किशोर भागवत यांनी वेळोवेळी समाजकार्यात केलेल्या सहभागाबद्दल त्यांचा शिवसंकल्प अभियानांतर्गत सत्कार करण्यात आला सदर अभियानाचे सदस्य रक्तदाते स्वर्गीय विनय वाघ यांना आयोजित बैठकीमध्ये सर्व शिवप्रेमींच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.यापूर्वी रक्तदान शिव संकल्प अभियानांतर्गत २०२३ ला एक हजाराच्या वर तर २०२४ ला पंधराशे च्यावर रक्तदात्यांनी रक्तदान करून या अभियानामध्ये सहभाग घेतला होता तर २०२५ मध्ये २१०१ रक्तदानाचा शिवसंकल्प आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे आयोजित बैठकीला तेल्हारा शहरा सह तालुक्यातील शिवप्रेमी रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खारोडे यांनी केले. आयोजित बैठकीमध्ये भाजपा ,शिवसेना उबाठा ,शिवसेना शिंदे गट,वंचित बहुजन आघाडीराष्ट्रीय भारतीय काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समितीकुणबी समाज संघटनामयूर चहाजगुणे उपाध्यक्ष भाजप इत्यादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून रक्तदान शिवसंकल्प अभियानामध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतली.तसेच थोरात साहेब, ठाणेदार उल्लेमल्ले साहेब,वैधकीय अधिकारी डॉ.. पेंदाम साहेब,, इंजि.. बर्डे साहेब,राठोड साहेब अजय गावंडे, शिवसेना ता. प्रमुख, (उभाठा ), मधुसूदन बरिंगे (वंचित बहुजन आघाडी )आडवोकेट पवन शर्मा (क्रांग्रस )मनीषा देशमुख (राष्ट्रवादी ) दिलीप फोकमारे,इत्यादी लोकांनी आपलें विचार व्यक्त केले.आभार प्रदर्शन आनंद बोदळे यांनी केले

