श्री शिवाजी महाविद्यालयात‘वाचन पंधरवडा’ निमित्त दोनदिवसीय वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन..

अकोलाः विद्यार्थ्यांमधे वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्याचबोबर त्यांच्यामध्ये वाचन कला विकसित व्हावी या उद्देशाने, शिवाजी महाविद्यालय अकोला येथे महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्पा अंतर्गत १ ते १५ जाने. वाचन पंधरवडा निमित्त दि. ६ व ७ दोनदिवसीय वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.

या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या डॉ. अनघा सोमवंशी यांनी वाचनाच्या पद्धती तर दुसऱ्या दिवशी डॉ. राहुल सुडके यांनी वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. आर. एम. भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते आणि इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पी. पी. देशमुख यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्याचबरोबर मानव विद्याशाखेचे प्रमुख डॉ. नाना वानखेडे, मराठी विभाग प्रमुख  डॉ. संजय पोहरे,  इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. नितीन मोहोड, मराठी विभागातील डॉ. श्रद्धा थोरात आणि इंग्रजी विभागातील डॉ. कपिला म्हैसने ह्या मंच्यावर उपस्थित होत्या. या दोनदिवसीय कार्यशाळेचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागातील प्रा. निशा देशमुख यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ऋतुजा मुऱ्हेकार यांनी केले. कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इंग्रजी विभागातील डॉ. प्रविण वाघमारे, प्रा. अर्चना देशमुख, निशा देशमुख, प्रा. राहुल सोळंके, प्रा. आकाश हराळ व प्रा. नम्रता माळी या सर्वांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.