श्री शिवाजी महाविद्यालयात सायबर सुरक्षा कार्यशाळा संपन्न…

स्थानिक: अकोला.

श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला.राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने रामदास पेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे,प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील कार्यरत असलेले सायबर सेल प्रमुख श्रीमती कान्होपात्रा बंसा, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद श्री रामेश्वर वाकडे, श्री दादाराव सोनोने, रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मनोज बहुरे उपस्थित होते.

श्रीमती कान्होपात्रा बंसा यांनी सायबर सुरक्षा बद्दल मार्गदर्शन करीत ऑनलाइन पद्धतीने पैशांची फसवणूक कशी होते, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक श्री मनोज बहुरे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस खाते व त्यामधील विविध कलमा बद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर भिसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा बद्दल माहिती देताना सांगितले विद्यार्थ्यांची त्याच प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले केल्याबद्दल पोलीस विभागाचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम राठोड यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन मयुरी शिरसोले तर आभार प्रदर्शन रोहन बुंदेले यांनी केले कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख डॉ.आनंदा काळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मयुरी गुडदे प्रा.रसिका पाटील व इंग्रजी विभागातील अनेक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका प्रतीनिधी : शुभम गोळे

Leave a Reply

Your email address will not be published.