महिलांनी स्वतः आवाज बुलंद करून आपले अधिकार काबीज करायला पाहिजे…
– मंगलताई खिवंसरा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मनुस्मृती दहन दिवसाला भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात येते या परिषदेला प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. मंगलताई खिवंसरा यांनी उपस्थित महिलाशक्तिला मार्गदर्शन करतांना म्हटले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन करून भारतातील स्त्रीयांना मनुवादी मानसिकतेतुन मुक्ती दिली व भारतीय संविधान लिहुन महिलांना समानतेचा अधिकार बहाल केला. बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात मोठे स्वतंत्र बहाल केले. शासनाचा निर्णय आहे की शेतीच्या सातबारावर मालकी हक्काच्या रकाण्यात पती व पत्नी या दोघांच्याही नावाची नोंद हि चढवायलाच हवी पण आपण महिला कधी त्या शासननिर्णयाचा पाठपुरावाच करत नाही व महिला ह्या अजुनही मनुस्मृतीच्या रूढी परंपरेच्या विरुद्ध बंड पुकारून उभ्या राहत नसल्याने महिला अत्याचारांच्या घटना थांबत नाही आहेत. ह्यासाठी महिलांनी पेटुन उठायला हवे, आपला आवाज बुलंद करून भारतीय संविधानातुन मिळालेला स्त्री पुरुष समानतेचा अधिकार काबीज करायला हवा. तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला ह्या स्वतंत्र होतील असे मत व्यक्त केले. या भारतीय स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आम्रपालीताई खंडारे ह्या होत्या तर या परिषदेला प्रमुख वक्ता म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. मंगलताई खिवंसरा ह्यांनी प्रमुख मार्गदर्शन केले असुन उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महिला प्रदेश महासचिव मा. अरूंधतीताई शिरसाट ह्या तर स्वागताध्यक्ष म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मा. वंदनाताई वासनिक आणि प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलींद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जि. प. अध्यक्ष तथा महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव मा. संगीताताई अढावू, सम्यंक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष इंजि धिरज इंगळे, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर महासचिव गजानन गवई, युवा महानगर अध्यक्ष वैभव खडसे, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, जिल्हा संघटक अनुराधाताई ठाकरे, जि . संघटक निलोफर शहा, युवा जिल्हा पदाधिकारी एड. मिनल मेंढे, नाहरीताई चव्हाण, जि. प. सभापती मायाताई नाईक, रिजवाना परविन शेख, योगीताताई रोकडे, मा. जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य पुष्पाताई इंगळे, मा. जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, प्रतिभाताई अवचार, शोभाताई शेळके, किरणताई बोराखडे, इंदुताई मेश्राम, मंदाताई कोल्हे, प्रज्ञाताई इंगळे, वैशालीताई वाहुरवाघ, रेखाताई अंभोरे, आशाताई अहिरे, रितीकाताई गोपनारायण, सुनिताताई टप्पे, आम्रपालीताई गवारगुरू, आम्रपालीताई तायडे, शारदाताई सोनटक्के, सरलाताई मेश्राम, राजकन्याताई कवाळकर, सुवर्णाताई जाधव, प्रा. मंतोषताई मोहोळ, ज्योतीताई खिल्लारे, सुवर्णाताई जाधव, संगीताताई खंडारे, वैशालीताई कांबळे, लक्ष्मीताई वानखडे, मायाताई इंगळे, मंदाताई शिरसाट, तेजस्विनी बागडे, उमाताई अंभोरे, वैशालीताई सदाशिव, रंजनाताई गावंडे रेखाताई अवचार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या भारतीय स्त्री मुक्ती परिषदेत 25 डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून शासनाने जाहीर करावा या मागणीसह विवीध सहा ठराव घेण्यात आले. ठराव क्रमांक 1) 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करावा. अनुमोदक लक्ष्मीताई वानखडे तर सुचक उमाताई अंभोरे ह्या होत्या
ठराव क्रमांक 2) गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा ताबोडतोब राजीनामा द्यावा. अनुमोदक सुनिता हिरोळे तर सुचक अनुराधा ठाकरे ह्या होत्या.
ठराव क्रमांक 3) परभणी येथे संविधानाचे शिल्प फोडण्याच्या घटनेचा भारतीय स्त्री मुक्ती परिषद तीव्र निषेध करत आहे. अनुमोदक अर्चना डाबेराव तर सुचक मिनाक्षी शेळके ह्या होत्या.
ठराव क्रमांक 4) महिलांचा सन्मान व सुरक्षितता आणि सक्षमीकरण या उद्देशानेच महिलांसाठी योजना आखल्या पाहिजेत. अनुमोदक निर्मला इंगळे तर सुचक सरलाताई मेश्राम ह्या होत्या
ठराव क्रमांक 5) भाजपा सरकारने आणलेल्या “एक देश एक निवडणुक” पद्धतीला आम्ही विरोध करतो. अनुमोदक ज्योती खिल्लारे तर सुचक प्रा. मंतोषताई मोहोळ ह्या होत्या
ठराव क्रमांक 6) कृषीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. अनुमोदक वैशाली कांबळे तर सुचक विद्या सामस्कर ह्या होत्या. सदर ठराव हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलांनी एक मताने मंजूर करून मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारताचे प्रधानमंत्री भारत सरकार व मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले आहेत. या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे, युवा आघाडी, महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यंक विद्यार्थी आंदोलनचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अकोला जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.