संकल्पसेवा संस्थेचा अभिनव उपक्रम…

संत “लहानुजी महाराज विद्यालय” चितलवाडी येथे “भारतीय संविधान ” या विषयावर सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन .

भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने प्रेरित होऊन आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी” संत लहानुजी महाराज विद्यालय” चिलवाडी तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथे संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्था दर्यापूर यांच्यातर्फे भारतीय संविधाना या विषयावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. दिपाली वानखडे मॅडम हे होत्या त्यांनी कार्यक्रमाला परवानगी दिली तसेच कार्यक्रमाला डॉ प्रसाद बावनेर दर्यापूर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले व सूचना दिल्या .

स्पर्धेमध्ये एकूण 40 बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता विद्यालयातील एकूण 60 विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक श्री संतोष वाडेकर सर , श्री सुशील खारोडे , श्री सुभाष दवणे सर, रेणुका बाजारे मॅडम श्री पंकज इंगळे , इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले . 2024- 25 हे वर्ष भारत सरकारने भारतीय संविधान आणि भारतीय प्रजासत्ताकाचे ” अमृत महोत्सवी वर्ष ” घोषित केले आहे त्यानिमित्ताने संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्थेने वर्षभर भारतीय संविधान यावर आधारित विविध उपक्रम आयोजित करण्याचे ठरविले असून सर्व जनतेने तन मन धनाने या उपक्रमात सहकार्य करावे आणि प्रत्यक्ष सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेमार्फत श्री अमित आगलावे यांनी केले .उपरोक्त कार्यक्रमासाठी श्री अमित कुटेमाटे याचे विशेष सहकार्य लाभले .कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय संविधानाच्या उद्देश्य पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले .संकल्प सेवा संस्थेतर्फे विद्यालयाचे आभार मानण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published.