‘पुष्पा-२ द- रुल’ सिनेमांचा पडता काळ सावरणारा चित्रपट – प्रा. राहुल माहुरे

कोण म्हणतं? आजच्या डिजिटल काळात पूर्वीसारखं सिनेमाचं क्रेझ नाही..‘हाऊसफुल्ल’ चा बोर्ड नामशेष झालाय!!!!सिनेमा टॅाकीज डबघाईस येत आहेत!!!इंटरनेट आणि ओटीटी च्या काळात प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरकत नाहीत….‘पुष्पा-२ द-रुल’ या सिनेमाकडे पाहल्यावर ह्या सर्व संकल्पना बदलुन जातात…चांगले कलाकार, चांगली ॲक्टींग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी कथा, मनाला भिडणारे संवाद, कर्णमधुर संगीत आणि तेवढ चं ताकदीचे नृत्य यांचा सुरेख संगम म्हणजे ‘पुष्पा-२’ अॅक्शन, रोमान्स, नाच-गाणं, प्रतिशोध, राग, सूड, आनंद, अहंकार असे सर्व मसाले ‘पुष्पा-२ द-रुल’ मध्ये. काठोकाठ भरलेले आहेत.

‘हिंसाचार’ दाक्षिणात्य सिनेमाला नवा नाही; ‘अॅक्शन’ला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यात पुष्पा-२ मागे नाही. नावीन्यपूर्ण ‘देशी’ अॅक्शनची पर्वणी प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. बॅालीवूड वाल्यांनी यातुन नक्कीचं धडा घ्यावा. जनरली सध्या पार्ट -१,२,३ असा सिनेमांचा नविन ट्रेंड सेट झालाय या ट्रेंड मधले बहुतांश पहिला चं पार्ट उत्तम निघाला असे चित्रपट आहेत. दुसरा आणि तिसरा जसा पाहीजे तसा चालला नाही पुष्पा-२ मात्र याला अपवाद आहे.तीन वर्षापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. तो इंतजार फळास आला.जे थिएटर ओस पडले होते ते प्रेक्षकांनी खचाखच्च भरले आहेत. ब्लॅक ने तिकिट विकणे हे कालबाह्य चं झालं होतं पुष्पा-२ मुळे ते देखील कित्येक वर्षांनंतर अनुभवास मिळाले. थियटर मालकांना फक्त एकचं विनंती आहे जनता जेवढ्या रुपयाचे तिकीट विकत घेते किमान तेवढ्या सुविधा त्यांना सिनेमा पाहतांना दिल्या पाहीजे. कारण मल्टीफ्लेक्स वाले तुमचा बिझिनेस ठप्प करायला बसले चं आहेत. दिवस बदलायला वेळ लागत नाही…काही शहारातील पडदा ब्राईटनेस जसा पाहीजे तसा नाही….अंधुक अंधुक चित्र दिसते असे निदर्शनास आले आहे. याकडे लक्ष द्यावे…

प्रेक्षकांना ‘मायबाप’ उगाचं संबोधत नाहीत कुणाला डोक्यावर घ्यायचं कुणाला त्याची जागा दाखवायची हे त्यांना चांगले माहीत आहे..म्हणून प्रेक्षकांना चांगल्या सुविधा थियटर मालकांनी द्याव्यात यासाठी त्यांनी कटिबद्ध असले पाहीजे…पुष्पा-२ चित्रपटाचे ओटीटी राइट्स तब्बल 270 कोटी रुपयांना विकले गेल्याची बातमी आहे. त्यामुळे डिजिटल राइट्सच्याबाबतीत हा चित्रपट देशातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. मूळ तेलुगू भाषेत असलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा-२ द रुल’ हा ॲक्शन ड्रामा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरत आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चार दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात अवघ्या चार दिवसात तब्बल 529.45 कोटी रुपयांचा तर जगभरात 800 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला.. ‘पुष्पा’ साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला अल्लू अर्जुन पुष्पा-२ मध्ये देखील अभिनयाचे उच्चांक गाठण्यात मागे पडणार नाही. सोबतचं तगडी स्टारकास्ट रमेश राव, जगपती बाबू, सुनील, अनसूया भारद्वाज, सौरव सचदेवा, तारक पोनप्पा, कल्पा लथा, अजय या सर्व सहाय्यक कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.सिनेमा विषयी बऱ्याचं सिनेतज्ञांनी निगेटिव्ह रिव्ह्यु दिलेत परंतु ते खरे वाटत नाहीत.चित्रपटाची लोकप्रियता हे त्याचे उत्तर आहे.

सिनेमाला चार चांद लावले आहेत ते हिंदी संवाद लेखक राजेंद्र सप्रे यांनी तर अल्लु अर्जुन ला आवाज दिला आहे मराठी चा आघाडीचा स्टार श्रेयस तळपदे यांनी पुष्पाला ‘पॅन इंडिया’ करण्याचं मोठं श्रेय हे निश्चितचं श्रेयसच्या आवाजाला. प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठाव घेणारे असे हिंदी संवाद आहेत.व्हीएफएक्स, सिनेमॅटोग्राफी, अॅक्शन कोरिओग्राफी जबरदस्त तांत्रिकदृष्ट्या चित्रपट खूप समृद्ध आहे. देवी श्री प्रसाद यांच्या संगीतात सुंदरपणे चित्रित केलेले डान्सही ‘व्हीज्युअल ट्रीट’ म्हणावे असे आहेत.पुष्पा -२ मधुन एक गोष्ट शिकायला मिळाली तसं पाहता ती आधी माहीत चं होती परंतु आता जास्त चं लक्षात राहील ती अशी की, बायको चं नेहमी ऐकावं तेव्हाचं आपण फायद्यात राहतो…असो हा गमतीचा भाग आहे..

खरं तर बायकोच्या इच्छेखातर नाही तर एका सामान्य व्यक्तीला जो की आपला मतदार आहे. भारत देशाचा नागरिक आहे. तो मुख्यमंत्र्याकडे एका फोटो ची मागणी करतो की तुमच्या सोबत फोटो काढु द्या माझ्या बायको ची इच्छा आहे. परंतु त्याला नकार दिला जातो.नायक काय काम करतो? त्याचे गोत्र काय आहे? यावरुन एका सामान्य माणसाला राज्याचा मुख्यमंत्री फोटो काढायला मनाई करतो. जो की नायक मुख्यमंत्र्याच्या पार्टी ला सातत्याने मोठ्या प्रमाणात पार्टी फंड देत असतो. मुख्यमंत्री नायकाला अपमानास्पद वागणूक देतो. इथं चं मुख्य ठिणगी पडते आणि कथानकाला सुरुवात होते. म्हणून मानवाला मानवासारखी वागणुक द्या मानवता धर्म जपा, माणुसकीने राहा. जेणेकरून सामान्य माणसाची पॅावर काय आहे याची प्रचीती पाहु नका. कारण सामान्य माणुस आहे म्हणून समाज आणि देश आहे. माणसाला माणसांसारखे वागवा…हा संदेश चं जणु पुष्पा-२ मध्ये आहे.

साऊथ इंडस्ट्री चा ट्रेंड यामधे देखील कायम आहे तो म्हणजे परिवार… साऊथ च्या सिनेमाची खासीयत आहे ते कथानकामध्ये परिवाराला फार महत्त्व देतात. परिवार त्यांच्या केंद्रस्थानी असतो.बाकी सिनेमा आपण थिएटर मधेचं जावुन पाहा त्याबद्दल समोर सांगून तुमची उत्सुकता कमी करणार नाही.हैदराबादच्या ‘संध्या’ थिएटरमध्ये इंटरव्हल मध्ये जी चेंगराचेंगरी झाली त्याचे दुःख आहे. नेमकं सत्य काय आहे हे तपासात समोर येईलचं प्रेक्षकांनी संयम बाळगावा..

पुष्पा-३ च्या प्रतिक्षेत…..

✍🏻प्रा. राहुल गोवर्धन माहुरे

शांती नगर, जुनेशहर,अकोला..

मोबा-9822278925

Leave a Reply

Your email address will not be published.