दिनांक :- ६ डिसेंबर २०२४
स्थानिक: देगांव ( तालुका बाळापूर )
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयात अनेक अनुयायांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तथागत अंभोरे हे होते. महाकारूनिक भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक मा. डॉ. अशोक शिरसाट सर यांनी प्रास्ताविक केले, तर जेष्ठ नागरिक श्रीकृष्ण अंभोरे, नाटककार मोहन अवचार, युवा वक्ते नागसेन अंभोरे, मनोज अंभोरे, अंजली अंभोरे, आदर्श अंभोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथागत अंभोरे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आपले विचार व्यक्त केले. यावेळी रील स्टार आकाश इंगळे, राजू इंगळे, ईश्वरी गावंडे, यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. राधिका गावंडे हिने आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.