अकोला पोलीस दल सीसीटीएनएस (काईम कीमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टम) प्रणालीने सुसज्ज!

पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी सीसीटीएनएस (काईम कीमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टम) प्रणाली सुरू केली आहे यात अभीलेख्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. सीसीटीएनएस प्रणालीत देशपातळीवरील गुन्हे व माहीती यामध्ये उपलब्ध होते त्यामध्ये ई-तकार, अनोळखी मृतदेह शोधने, गुन्हे प्रतिबंध कारवाई, वाहनांची पडताळणी करणे, गुन्हे उघडकीस आणने आदी करीता ही प्रणाली महत्वाची ठरते. सीसीटीएनएस मध्ये पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयांपासून ते तपास व दोषारोपपत्र इत्यादी माहीती उपलोड करावी लागते याकरीता प्रत्येक पोलीस स्टेशनला ४ संगणक देण्यात आलेले असून एक प्रशिक्षीत हॅन्डहोल्डरची सदर कामाकरीता नेमणुक करण्यात आलेली आहे.

सीसीटीएनएस ची कामगीरी बाबत मा पोलीस अधीक्षक अकोला यांचेकडून दर महीण्याला आढावा घेण्यात येतो त्याअनुषंगाने आज दिनांक ०७.१२.२०२४ रोजी अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयातील व जिल्हा संगणक प्रशिक्षण केंद्रातील अमलंदार यांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.

सीसीटीएनएस विभागातील माहीतीचा प्रत्येक महीण्याला गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांचेकडून आढावा घेतला जातो, व सीसीटीएनएस कामकाजा सबंधी विविध निकष लावुन प्रत्येक घटकांची एकत्रीत राज्यस्तरीय रॅकींग गुन्हे अन्वेषण विभागाकडून दर महीण्याला जाहीर करण्यात येते ऑगष्ट २०२४ मध्ये अकोला जिल्हयाची महाराष्ट्रातील ४६ युनिट पैकी १९ रँकीग होती तसेच माहे सप्टेंबर २०२४ ची २५ वी रॅकींग जिल्हयाला मिळाली होती मात्र पोलीस अधीक्षक श्री बच्चनसिंग यांचे नियमीत आढावा व मार्गदर्शनाखाली माहे ऑक्टोंबर २०२४ चे रॅकींग मध्ये उत्कृष्ठ काम करून एकुन ४६ घटकांपैकी अकोला पोलीस दलाने २०१ पैकी १८४ गुण प्राप्त करून राज्यात १४ वा क्रमांक तसेच अमरावती परीक्षेत्र, अमरावती विभागातुन व्दीतीय क्रमांक पटकावुन जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.

मिटींग मध्ये सिसिटीएनएस रॅकींग मध्ये पोलीस स्टेशनचे अमंलदार १. मपोका सोनल गवई पोस्टे खदान २. मपोका प्रज्ञा बांगर पोरटे डाबकीरोड ३. मपोका अनिता खडसे पोस्टे सिटीकोतवाली ४. मपोका सोनाली राठोड पोस्टे पातुर ५. मपोका मनिषा महाजन पोस्टे अकोटफैल ६. मपोका मनाली आडे पोस्टे उरळ ७. मपोका शालू हंबर्डे पोस्टे एमआयडीसी ८. मपोका मथुरा सोळंके पोस्टे मुर्तिजापुर ग्रामीन ९. मपोका रंजना उंबरकर पोस्टे मुर्तिजापुर शहर यांनी उत्कृष्ठ कामगीरी केल्यामुळे त्यांचा प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.