स्थानिक: अकोला तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी गावामध्ये संत लहानुजी महाराज विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले. विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी असणारे योगदान माहित व्हावे व त्या प्रेरणेने विद्यार्थी घडावे या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. गीत गाऊन त्यांना वंदन केले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली वानखडे मॅम, बाजारे मॅम, खारोडे सर, इंगळे सर इत्यादी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.