भारतीय संविधान: लोकशाही सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयावर व्याख्यान संपन्न..
स्थानिक: अकोला येथे दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा,अकोला यांच्या कडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला प्रमिलाताई ओक सभागृहयेथे आयोजित करण्यात आले. हे व्याख्यानमालेचे १६ वे वर्ष असून भारतीय संविधान: लोकशाही सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयावर मुंबई येथील वक्ते अँड. जयमंगल धनराज यांनी पहिले पुष्प गुंफताना निती निर्देशक तत्वे याचा वापर जनेतेने केला तर दर पाच वर्षांनी नेतृत्व करणारा व्यक्ती बदलू शकतो. स्तिर आणि मजबूत सरकार ची हमी देणाऱ्यांना उत्तरदायी आणि जबाबदार सरकारची हमी का देत नाही असा प्रश्न लोकांनी विचारायला पाहिजे असे ते म्हणत होते.
पुढे आपल्या भाषणात बोलतांना ७५ वर्ष झाली तरी राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची मुळं रोवली गेली नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करताना संविधानाचे अमृतमहोत्सव साजरा करण्याची ऊर्मी निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे.यासाठी लोकशाहीच्या प्रक्रियेत नवीन पिढीला समावेश करून घ्यावा लागेल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन मनोज जयस्वाल,प्रस्तावना व व्यक्ती परिचय प्रा. राजेश पातोडे तर आभार राहुल वानखडे यांनी केले.