प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून मोठ्या उत्साहात साजरा..

स्थानिक : अकोला येथे त्याग, परोपकार, शौर्य, साधेपणा व शुचिता इत्यांदीनी संपन्न असणाऱ्या ज्यांच्याकडे समाज एक आदर्श म्हणून पाहते असे वंचित बहुजन आघाडीच्या मार्गदर्शिका नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांचा वाढदिवस विविध सामजिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, कृषी नगर येथील त्रिमूर्ती बुद्ध विहार जवळ जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर भाऊ सुलताने तसेच वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम लहान लहान बच्चे कंपनीच्या वतीने केक कापण्यात आला व त्यानंतर प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आज पर्यंत केलेल्या सामजिक कार्याची सर्वांना जाणीव करून देऊन त्यांचा जीवन प्रवास वर्णन केला.

या नंतर शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शाळेची बॅग वाटप करण्यात आली,यावेळी विद्यार्थी खूप उत्साही दिसून आले, यावेळी माजी नगरसेवक रामा भाऊ तायडे, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुनबी ,जिल्हा उपाध्यक्ष नितीन वानखडे ,तेल्हारा तालुका अध्यक्ष जिया शाह, महासचिव राजेश दारोकार, संघटक अनंता इंगळे,बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष निक्की डोंगरे, मूर्तीजापुर तालुका अध्यक्ष अक्षय राऊत, प्रसिध्दी प्रमुख महेंद्र तायडे, कृषी नगर सुधार समिती जय रामा तायडे अकोला प्रसिद्धी प्रमुख आकाश जंजाळ ,सचिन भाऊ शिराळे, ऍड विजेंद्र तायडे, प्रफुल इंगळे, ऍड अमोल तायडे, राज तायडे, आकाश गोपनारायण, भारत तायडे, सुमित तेलगोटे, आराखराव, शांतनु तायडे, रोहित इंगोले, अरुण उचित, अनुराग वासनिक, अनिल मेश्राम, आदित्य इंगोले, सागर मेश्रमा, आदित्या दास, यासह कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.