वंचितचे उमेदवार निवडून द्या ; हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

कुरणखेड येथील सभेला नागरिकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

अकोला : तुम्ही सुगत वाघमारे आणि ज्ञानेश्वर सुलताने हे दोन्ही उमेदवार निवडून द्या. शासन कोणाचेही असो हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही. असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील प्रचार सभेत केले.ॲड. आंबेडकर म्हणाले की, आजही बाजारात 500 रुपये कमी भावाने कापूस विकत घेतला जातोय. 1500 ते 2000 प्रमाणे सोयाबीन स्वस्त विकत घेतले जात आहे. हमीभावाचा कायदा असता आणि व्यापाऱ्याला दंडात्मक कारवाई असती की, तू जर दिलेल्या भावापेक्षा कमी भाव देत असशील तर तुला 5 वर्षाची शिक्षा होणार आहे. तर कोणत्या व्यापाऱ्याने कमी भावाने विकत घेतल असता ?

रणधीर सावरकर हे विद्वान आहेत. प्रचंड विद्वान आहेत. त्यांची प्रचंड विद्वानता त्यांनी सभागृहात दाखवली. त्यांनी शासन जे विदर्भात विहीर वाटप करतात त्या कशा 30 टक्क्यांनी कमी करता येतील याची मांडणी त्यांनी केली. त्यामुळे 3 वर्षांपूर्वी विहरीसाठी मिळणारा निधी आणि आताचा निधी यात 30 टक्के कपात झाली असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.जे काँगेसवाले कधीही औरंगजेबच्या कबरी शेजारी उभे राहायला तयार नाहीत, टीपू सुलतानचे नाव घ्यायला तयार नाहीत, एनआरसीच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीत. अशा काँगेसवाल्यांवर मुस्लिम विश्वास ठेवायला लागले आहेत का ? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला.

मुस्लिम समाजाला उद्देशून ॲड. आंबेडकरांनी म्हटले की, पाठिंबा मागणं हा गुन्हा आहे का ? मोहम्मद पैगंबर बिल मंजूर करण्यासाठी पाठिंबा मागणं हा गुन्हा आहे, तर 100 वेळा हा गुन्हा करू आणि मुस्लिमांना पाठिंबा मागू.यावेळी मूर्तिजापूर आणि अकोला पूर्व मधील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.