अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री हरीशभाई अलीमचंदानी यांना वंचित बहुजन आघाडी जाहीर पाठींबा..

अकोला महानगरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आपलं शहर विकसित होण्याच्या दृष्टीने मा. बाळासाहेब आंबेडकर 1980 पासून प्रयत्न करत आहेत. अकोला शहर दंगल मुक्त राहावे, अकोला सुंदर आणि देखणे व्हावे या साठी विकासाची दृष्टी असणारे स्व. विनय कुमार पाराशर, स्व. डेंडॅडी देशमुख, अॅड. मोहम्मद अली काझी साहेब, अब्दुलाखान मंझर साहेब व श्री चंद्रशेखर गाडगीळ अश्या अनेक मान्यवरांनी या शहराला स्वतंत्र आणि उत्तम ओळख दिली आहे. मिल कामगार, कष्टकरी, तसेच कापसाची आणि धान्याची सर्वात मोठी बाजारपेठ आणि विशेषतः विस्तृत आणि हिरवेगार बगीचे, आणि भव्य क्रिडांगणं असलेले असे आपलं शहर अनेक कृतिशिल नागरीकांनी व सेवानिवृत्त लोकांनी उभे केलेले आहे आणि आजही या शहरातील अनेक संवेदनशिल नागरीक अशा नव्या स्वरूपातील शहराला निर्माण करीत आहे.

या शहरात सर्व जाती समाजाचे व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची परंपरा आहे. परंतू याला गालबोट लावण्याचे काम कॉग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी केलेले आहे. त्यामुळे पुन्हा हे सुसंस्कृत शहर धार्मिक दंगलीचे केंद्र होवु नये. या शहरात शांतता प्रस्थापित करणे हे याला आमचे प्राधान्य आहे. या शहरात शांतता आणि विकास सोबत नांदावे या दृष्टिकोनातून आम्ही भूमिका घेत आहोत. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा आणि सत्येचा गैरवापर न करणारे माजी नगराध्यक्ष नगरसेवक अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री हरीशभाई अलीमचंदानी यांना वंचित बहुजन आघाडी जाहीर पाठींबा देत आहे.आम्ही अकोला महानगरातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिका-यांना तसेच शहरातील नागरीक, मतदारांना आणि भाजपच्या मतदारांना तसेच मुस्लिम बांधवांना विनंती वजा आव्हान करतो की त्यांनी श्री हरीशभाई अलीमचंदानी यांच्या मागे उभे रहावे व त्यांना मतदान करुन विजयी करावे. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी संबोधित केले तर जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महानगर अध्यक्ष मजहर खान, महिला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, अँड अनवर शेरा, विकास सदांशिव आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.