भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज जाधव यांचा वंचित मध्ये प्रवेश..
स्थानिक:-
बार्शीटाकळी येथील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा तांडा सुधार समिती अशासकीय सदस्य व पं. स. बार्शीटाकळी उपसभापती संगीता ताई जाधव यांचे पती श्री मनोज जाधव यांचा जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश पार पडला.
यावेळी पिंजरचे माजी सरपंच अशोक भाऊ लोनाग्रे, प्रदीप भाऊ शिरसाट, तिक्ष्णगत वाघमारे, माजी तालुकध्यक्ष युवक आघाडी अमोल जामनिक, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, शंभू सेना तालुकाध्यक्ष सचिन आगाशे आदी पदाधिकारी उपस्थित होते.