लोकनेते बी आर शिरसाट यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर व्याख्यान..

आंबेडकरी राजकारणातील अकोला जिल्ह्याचे नेते दिवंगत बी.आर.सिरसाट यांचा गुरुवारी सतरावा स्मृतिदिन असून त्या निमित्ताने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तत्कालीन भारिप बहुजन महासंघात काम करून आंबेडकरी राजकारण मजबूत करणारे बी.आर. शिरसाट यांच्या निधनानंतर गेली 17 वर्ष त्यांच्या स्मृतीत विशेष समारंभ आयोजित केला जातो. यावेळी गुरुवार दि.31 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता येथील प्रमिलाताई ओक सभागृहात प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ. मनोहर नाईक यांचे वंचितांचा सत्तासंघर्ष या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. बी. आर. शिरसाट यांच्या स्मृती जाग्या करताना केवळ कार्यक्रम न करता त्या निमित्ताने श्रोत्यांना वैचारिक मेजवानी मिळावी या हेतूने प्रत्येक वर्षी एका विषयावर अभ्यासू विचारांची मेजवानी देण्याची प्रथा आयोजन समितीने सुरू केली आहे. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर या विषयाचे वेगळे महत्व आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य उपाध्यक्ष मा. यु.जी. बोराडे हे राहणार असून भीमराव तायडे, प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती शिरसाट, राजेंद्र पातोडे, पी.जे. वानखडे, प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, संगिताताई अढाऊ, सुगत वाघमारे, ज्ञानेश्वर सुलताने, सुनिल फाटकर, बालमुकुंद भिरड, प्रदीप वानखडे, आम्रपालीताई खंडारे, प्रा.डॉ. संतोष हुशे, मायाताई नाईक, योगिताताई रोकडे, रिझवाना परवीन, नतिकोद्दीन खतिब, झिशान हुसेन, वंदनाताई वासनिक, शंकरराव इंगळे, श्रीकांत घोगरे, धीरज इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने अमोल शिरसाट यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.