कपडे, फराळ मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप उपक्रम
स्थानिक/अकोला
श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला तर्फे बेघर निवारा येथील राहणाऱ्या लोकांसोबत सामाजिक दिवाळी साजरी करण्यात आली.
शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांच्या संकल्पनेतून माणसाने माणसाशी माणसासम वागणे या संदेशाप्रमाणे बेघर वंचित लोकांसोबत नवीन कपडे फराळ,व आरोग्य तपासणी करून सामाजिक दिवाळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या प्रमुख उपस्थित होते. यावेळी वाणिज्य व्यवस्थापन शाखेचे प्रमुख डॉ.संजय तिडके मानव विद्या शाखेचे प्रमुख डॉ. नाना वानखेडे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आनंदा काळे, मराठी विभाग प्रमुख डॉ.संजय पोहरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सचिन भुतेकर, अमरावती विद्यापीठाचे ब्रँड अँबेसिडर रोहन बुंदेले, निवारा व्यवस्थापक उषा राऊत अक्षय बुंदेले उपस्थित होते. सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आरोग्य तपासणी व औषधी वाटप करण्यात आले. सामाजिक दिवाळी उपक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली.
कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्र सेनेचे राष्ट्रीय सेवा योजनेचे रोहन मोराडे साक्षी तायडे,खुशी जाधव मयुरी सिरसोले सेजल ठाकरे,तेजस्विनी इंगळे आदी विद्यार्थी उपस्थित होते.