विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धीप्रामाण्यवादात वाढ व्हावी; डॉ. विवेक बांबोळे

अंधश्रद्धा निर्मूलनची वाचनालयास दिली पुस्तके भेट..

राजुरा: मोबाईलच्या काळात तरुणाई पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. तसेच ग्रामीण भागात अज्ञान, अंधश्रद्धा, गैरप्रवृत्ती मानसिक आरोग्य, कमी व्हावे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धीप्रामाण्यवादात वाढ व्हावी असे मेंदुविकार व मानसिक रोग तज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांनी सांगितले. राजुरा तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय, वरुर (रोड) येथे डॉ. विवेक बांबोळे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित अंधश्रद्धा निर्मूलनची पुस्तके भेट स्वरूपात दिली. आज समाजात कथित बुवा-बाबा,मांत्रिक,जाचक रूढी,प्रथा,परंपरा,व्रतवैकल्य,चमत्कार,कर्मकांडे अनेक ठिकाणी भोंदूगिरी, फसवणूक ,लुबाडणूक दिसते आहे. याकरिता नरेंद्र दाभोलकर यांची अंगात येणे,सत्यशोधक विवाह, खेळाचे मानसशास्त्र, बुवाबाजीचे घातक जाळे,भुताने झपाटणे, नवसाच्या पशुहत्येचा गळफास,माझा न संपणारा प्रवास,कर्मकांडाचे मायाजाल,श्रद्धा आणि अंधश्रद्धा वाद प्रतिवाद असे विविध पुस्तके भेट दिली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणते म्हणून ओळखल्या जाते. ते म्हणतात की, देवी अंगात येणे वा भुताने झपाटणे हे दोन्ही सारखेच असून त्यांचे मूळ ढोंगीपणात किंवा मानसिक आजारात शोधता येते.मानसिक आजारामुळे व्यक्तीला आपल्याला भुताने झपाटले आहे किंवा आपल्या शरीरात देवीने प्रवेश केला आहे असा भ्रम होतो. विशाल शेंडे, स्वप्नील जोवतोडे, प्रज्वल बोरकर,मयूर जानवे, सागर बोरकर, प्रवीण चौधरी,समीक्षा मोडक,श्रुती बोरकर,शंतनु आदे यांनी वाचनालयात पुस्तके दिल्याबद्दल डॉ. विवेक बांबोळे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.