‘वेट्टीयान’ च्या निमित्ताने – प्रा राहुल माहुरे


आपल्या सर्वांना मंदी आणी तेजी ह्या अर्थशास्त्रातील दोन अवस्था चांगल्याचं माहीत आहेत..
हल्ली बॅालीवूड वर देखील मंदीचे सावट आहे की काय?! अशी अवस्था दिसत आहेत.. चांगले सिनेमे येत नाहीत..
जे येत आहेत ते चालत नाहीत… इतके वाईट दिवस की जुने सिनेमे नव्याने रिलीज करत आहेत… याला अनेक कारणे असतील ही
पण प्रेक्षक आज ही दर्जेदार चित्रपट, नविन कलाकृती बघण्यासाठी थिएटर मध्ये जातात…
साऊथ इंडस्ट्री जोरात ताकदीचे सिनेमे रिलीज करत आहेत…त्यांचा देखील एक भला मोठा प्रेक्षक वर्ग आहे..कितीतरी हिंदी सिनेमे साऊथ चे रिमेक आहेत..हे मी नव्याने सांगायला नको..
अशा उदास वातावरणात मोठ मोठे थिएटर चालवणारे जसे बीग सिनेमा, मिराज,
पि व्ही आर हे चांगल्या सिनेमाांना स्क्रिन देत नाहीत ही शोकांतिका आहे…
नुकताचं रिलीज झालेला अमिताभ आणि रजनीकांत यांचा सिनेमा ‘वेट्टीयान’-द हंटर’
या सिनेमाला अकोला येथील मिराज सिनेमा मध्ये स्क्रीन नाही तो सिनेमा वसंत मधे सुरु आहे. तब्ब्ल ३३ वर्षांनी अमीताभ आणि रजनीकांत दोघे मातब्बर कलाकार सोबत काम करत आहेत 1991 मध्ये रिलीज झालेल्या ‘हम’ चित्रपटात दोघांनी शेवटचे एकत्र काम केले होते. ‘वेट्टैयान’ हा बिग बींचा पहिला तेलुगू चित्रपट आहे अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्याबरोबरच या चित्रपटात फहाद फासिल, राणा दग्गुबाती, मंजू वॉरियर, रितिका सिंग, दुशरा विजयन व व्ही. जे. रक्षा हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. हि एक पर्वणी चं प्रेक्षकांसाठी आहे. इतका चांगला सिनेमा सोशल मेसेज देणारा सिनेमा…
सामाजीक विषयावर प्रकाश टाकणारा सिनेमा…संविधानामध्ये शिक्षण सर्वांचा मुलभूत हक्क आहे प्रत्येकाला तो मिळाला चं पाहीजे पण सध्या शिक्षणाचे कसे बाजारीकरण होत आहे. आणि यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती कसा पिळला जात आहे याचे सुंदर चित्रण दिग्दर्शक टी.जे. ज्ञानवेल (TJ Jhaneval )यांनी केले आहे…
यापूर्वी टीजे ज्ञानवेल यांनी ‘जय भीम’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तो चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता. हे विशेष…वेट्टीयान कडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे असे चित्र पाहावयास मिळते…
आपण प्रेक्षक देखील तेवढेचं जबाबदार आहोत असं मला वाटतं.. चांगले कंटेन असलेल्या सिनेमांकडे आपण दुर्लक्ष करतो. सिनेमा मध्ये रजनीकांत पोलीस अधिकारी आहेत तर अमिताभ न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने सर्वांना THE BANNING OF UNREGULATED DEPOSIT SCHEMES ACT, 2019 (बड्स ॲक्ट २०१९) अनियंत्रित ठेव योजना कायदा २०१९ याविषयी माहीती मिळणार आहे हे विशेष…
त्याच प्रमाणे एनकाउंटर्स च्या नावाखाली निष्पाप लोकांचे जे बळी घेतल्या जातात त्याबद्दल या सिनेमा मघ्ये आवाज उठविला आहे. अमिताभ बच्चन यांचा या सिनेमामधील एक संवाद चित्रपटाची दिशा निर्धारित करतो ‘ शिक्षा जो गरीबों का भविष्य तय करती है। अमीरों का बिझीनेस नही होना चाहीये’ अशा दमदार संवादाने आणि महत्व पूर्ण थीम वर पूर्ण सिनेमा आधारीत आहे…
आजच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रहार करणारा सिनेमा आहे… तुमचे आमचे सामान्यांचे प्रश्न मांडणारा सिनेमा आहे…
अवश्य पाहावा……

✍🏻प्रा. राहुल गोवर्धन माहुरे
शांतीनगर, जुनेशहर, अकोला
९८२२२७८९२५

Leave a Reply

Your email address will not be published.