श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला मानसशास्त्र विभाग व मानस प्रबोधिनी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या अध्यक्षेतेखाली साजरा करण्यात आला. धकाधकीच्या जीवनात मानसिक आजाराचे वाढते प्रमाण बघून विद्यार्थ्यांच्या मानसिक आजाराविषयीचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी व समाजामध्ये जनजागृती व्हावी या सामाजिक उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून मानव्य विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. नाना वानखडे होते या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष पस्तापुरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.
दिनांक ७ व ८ ऑक्टोबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावती येथे सीबीटी या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते शिवाजी महाविद्यालय अकोला येथे “कळतं पण वळत नाही” या विषयावर (आरईबीटी) एक दिवशीय कार्यशाळा डॉ. पंकज वसाडकर अमरावती यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे सर होते यामध्ये मानसशास्त्र विषया बरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य विषयी पोस्टर प्रेसेंटेशन व मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन व त्याचबरोबर “मन रे तू काहे ना धीर धरे” या विषयावर प्रा.निलेश पाकदूणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11 ऑक्टोबर रोजी एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशन अकोला द्वारा संचलित बालविकास केंद्र कर्णबधिर विशेष शाळा ज्योती नगर अकोला येथे भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांस सोबत व त्याचबरोबर त्यांच्या पालकांसोबत संवाद साधून कर्णबधिर असलेल्या कुटुंबामध्ये कशा प्रकारचा ताण निर्माण होतो त्याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी घेतली .
त्याचबरोबर अकोल्यातील सुप्रसिद्ध मानस विकार तज्ञ डॉ. सुजय पाटील हॉस्पिटल अमानखा प्लॉट, अकोला येथे भेट देऊन तेथील मानसिक रुग्णांबद्दल व्यक्ती अभ्यास पद्धतीचा वापर करून माहिती जाणून घेतली. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी कौटुंबिक न्यायालयाला भेट देण्यात आली अशाप्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन मानसशास्त्र विभागातर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी मानव्य विज्ञान विद्याशाखेचे डॉ.संजय पोहरे,डॉ.श्रद्धा थोरात, डॉ.किशोर देशमुख,प्रा.सुनील मावस्कर , प्रा.नेत्रा मानकर, प्रा.वनिता भोपत, प्रा.हर्षवर्धन मानकर, इत्यादींची उपस्थिती होती. मानसशास्त्र विभागातील अरविंद अंभोरे, वैभव आगलावे, रूचिका सरदार, कल्पना तिखीले,जोत्सना,अविनाश, पूजा खिल्लारे,अमित मिटकरी, वैशाली गवई, साक्षी देवकर, हर्षाली काकडे,निशा हिवराळे,आरती तलोकर,रिंकू मेश्राम,प्रियांका,कानोजे,समी, बतुल,जरीना,महेक, जोत्सणा तायडे,दुर्गा चव्हाण,तृप्ती बिहाडे , प्राची अकोटकर,प्रणव, वैभवी गवई, विरसिंग इत्यादी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम मानसशास्त्र विभागांमध्ये घेण्यात आला.