८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.श्रीपाल सबनीस यांच्या शुभ हस्ते पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी अनौपचारिकपणे ‘गझलकार’ सीमोल्लंघन २०२४ ह्या ऑनलाइन अंकाचे प्रकाशन संपन्न झाले. त्यावेळी मा. श्रीपाल सबनीस बोलत होते.ते म्हणाले, केवळ मराठी गझलेला वाहिलेल्या ह्या ऑनलाइन अंकाची ही अभिनव संकल्पना मला आवडली. हा उपक्रम गेली सोळावर्षे चालविणाऱ्या संपादक, सहसंपादकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनामनःपूर्वक शुभेच्छा देतो. यावेळी अंकाचे सल्लागार संपादक शाहीर सुरेशकुमार वैराळकर आणि गझलकार कीर्ती वैराळकर – इंगोले उपस्थित होत्या.मराठी रसिकांना मराठी गझलने चांगलेच वेड लावले आहे. मराठी गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देणाऱ्या, ख्यातनाम गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या ‘गझलकार’ या मराठी गझलच्या ब्लॉगचा ‘गझलकार’ सीमोल्लंघन हा वार्षिकांक दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने मागील सोळा वर्षांपासून ऑनलाईन प्रकाशित होत आहे.यंदा ह्या अंकात महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील २०९ मराठी गझलकारांच्या ६०० हून अधिक गझला तसेच मराठी गझल संदर्भातील महत्त्वाचे लेख, गझलसंग्रहाची परीक्षणे समाविष्ट आहेत.ह्या अंकाचे सल्लागार संपादक शाहीरसुरेशकुमार वैराळकर असून ख्यातनाम ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी हा अंक संपादित केला आहे. देश, विदेशात सुप्रसिद्ध असलेले अकोल्याचे नामवंत चित्रकार सतीश पिंपळे यांनी ह्या अंकाचे देखणे मुखपृष्ठ केले आहे. अंकाचे सहसंपादक युवा गझलकारअमोल शिरसाट,विनोद देवरकर आहेत. मुद्रित शोधनाची महत्त्वपूर्ण बाजूगझलकार बाळू घेवारे यांनी सांभाळली आहे. खाली दिलेल्या लिंकवर हा अंक वाचता येईल.https://gazalakar24.blogspot.com/?m=0