अकोट ग्रामीण पोलीसांना माहीती मिळाली की, पोपटखेड गेटवरून एक आयशर हा भरधाव वेगाने व बेदकारपणे वाहन येत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून मा. सहायक पोलीस अधिक्षक श्री. अनमोल मित्तल साहेब यांनी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण व अकोट शहर पोलीस स्टेशनमधुन दोन टिम तयार करून तात्काळ मिळालेल्या माहिती प्रमाणे पाठविले असता. पोलीसांना हिवरखेड रोडने एक आयशर भरधाव वेगाने व वेदकारपणे हिवरखेड रोड जात दिसला. पोलीसांच्या टिमचे त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असुन आयशर चालक हा बेदरकारपणे वाहन चालवुन पोलीसांच्या अंगावरून आयशर ट्रकाने कट मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी जीवांची बाजी लावुन सदरचे वाहन अडगाय खु ता. अकोट येथे थांबविले असता. त्यामध्ये एकुण २७ गोवंश दिसले. दोन आरोपीतांना ताब्यात घेतले असुन आयशर वाहनासह एकुण २७ गोवंश किं अं. २०,०००,००रू वा मुददेभाल प्राप्त असुन सदरचे आरोपी हे सरहानपुर जिल्हयाचे (उत्तरप्रदेश) असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले पुढील कायदेशीर कार्यवाही वरिष्टांचे मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, बच्चन सिंह साहेब यांचे आदेशान्वये मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखालसहा. पोलीस अधिक्षक श्री. अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर जुनघरे, एपीआय योगीता ठाकरे, पीएसआय शेख, एएसआय लिखार, पोहेकों सोळंके, पोहेकों सोनवणे, पोहेकॉ तोमर, पोहेकों वासुदेव ठोसरे, पोकॉ गोपाल जाधव, पोकों वामन निसाळ, पोकों शैलेश जाधव पोकों रितेश जायभाय पोकों अमोल यांनी केली.