अकोला:भीमा कोरेगाव शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाचा वरचा भाग खाली कोसळल्यामुळे पावसाळ्यात विजयस्तंभ मधून पाणी गळत आहे.आणि भीमा कोरेगाव च्या १९१८ च्या दंगल मध्ये ३०००० हजार कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल आहेत ते माग घेण्यात यावे व विजय स्तंभाला जास्तीत जास्त निधी देण्यात यावी या विविध मागण्यासाठी निवेदन..
१) भीमा कोरेगाव विजयस्तंभावरील मागील ११ वर्षापूर्वी वीज कोसळली होती. व विजय स्तंभाचा वरील भाग खाली कोसळला होता. तो भाग त्या वेळी दुरुस्त केला गेला पण त्याच भागातून दरवर्षी पावसाळ्यात विजय स्तंभाच्या वरील भागातून पाणी विजयस्तंभ मध्ये जाऊन सर्व बाजूने पावसाचे पाणी बाहेर पडू लागले आहे व आज विजय स्तंभ फुगलेल्या अवस्थेत दिसतो आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर विजय स्तंभावर कुठल्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. म्हणून विजय स्तंभाची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी..
२) १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल व ३ जानेवारी २०१८ रोजी चे भारत बंद वेळी आपल्या अंदाजे ३० हजार कार्यकर्ते वर गुन्हे दाखल झालेले हे सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समिती स्थापन केली होती. मात्र अजूनही गुन्हे मागे घेतले गेले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणात व नोकरीत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तरी ते गुन्हे तात्काळ माघे घेण्यात यावे..
३) १ जानेवारी २०११ रोजी अजित दादा पवार यांनी प्रथमच जय स्तंभ या ठिकाणी मानवंदना दिली व जयस्तंभ विकास कामा साठी १०० कोटी रुपयाची घोषणा केली होती.ती रक्कम अजून ही जिल्हाधिकारी पुणे यांचे कडे वर्ग करण्यात आली नाही. ती रक्कम त्वरित वर्ग करण्यात यावी व जय स्तंभ शेजारील खाजगी जमीन अधिग्रहण करण्यात यावी..
४)१ जानेवारी २०१८ पासून शौर्य दौन नियोजनासाठी बार्टी चे माध्यमातून अंदाजे १० कोटी रुपये खर्च करण्यात येतो. तो निधी बार्टीच्या माध्यमातून खर्च न करता १ जानेवारी शौर्य दिना साठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी..
५) विजयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ पुणे दर्शन मध्ये समाविष्ट करण्यात यावे.व शासनाच्या वतीने जय स्तंभ या ठिकाणी इतिहास फलक लावण्यात यावा.
६) विजय स्तंभा वर १९७१ चे युद्धातील सैनिकांची काळी पाटी लावण्यात आली आहे.ती त्वरित काढून दुसऱ्या ठीकानी मान सन्मानाने लावण्यात यावी.
७) विजय स्तंभ या ठिकाणी देशभरातून भीम सैनिक येत असतात,त्यांच्या साठी पुणे स्टेशन ते विजय स्तंभ अशी स्वतंत्र बस सोडण्यात याव्यात व येणाऱ्या लोकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करण्यात यावी.तसेच पार्किंग साठी शासकीय जागेवर आरक्षण टाकण्यात यावं या विविध मागणी करिता निवेदन दिला आहे आमच्या मागण्यात पूर्ण नाही झाले तर महाराष्ट्रभर निळा जन्म उठाव मोर्चा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
!!.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.!!
आकाश शिरसाट,
गौतम भाऊ गवई
सनी भाऊ मृदुंगे
अक्षय भाऊ कोकणे
सागर भाऊ इंगळे
सिद्धू मेश्राम
नक्षन भाऊ शिरसाट
अनिकेत इंगळे
प्रकाश मेश्राम
आदर्श इंगळे
गोलू शिरसाट व
अनेक सामाजिक
कार्यकर्ते उपस्थित होते

