
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४-२५ या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. त्यासंदर्भात शासनाने उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर सुविधा उपलब्ध केली होती. अकोला पोलीस घटकासाठी सदर वेबसाईट वर १२२ मंजुर पदांकरीता एकूण ३३३ उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. वयोमर्यादा व शिदक्षणांसंबंधीत अटी व शर्ती लक्षात घेता २९ उमेदवार अपात्र आढळल्याने उर्वरीत ३०४ उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी प्रक्रीयेकरीता दिनांक ०७.०९.२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. मल्टीपर्पज हॉल, निमवाडी पोलीस वसाहत, अकोला येथे उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. सदरची कागदपत्र पडताळणी प्रक्रियेनंतर १२१ उमेदवार पात्र ठरले.
नमुद पात्र उमेदवारांना आज दिनांक ०९.०९.२०२४ रोजी मल्टीपर्पज हॉल, निमवाडी पोलीस वसाहत, अकोला येथे “रूजु आदेश” देण्यासाठी बोलविण्यात आले होते. सदर वेळी उपस्थित पात्र ठरलेल्या उमेदवाररांपैकी काही उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी शासनाच्या सदर योजनेचे कौतुक करून योजनेमुळे त्यांना पोलीस विभागाचे कामकाज जवळून पाहण्याची व अनुभव घेण्याची संधी मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला. सदर कार्यक्रमात उपस्थित जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला या कार्यालयातील कौशल्य विकास अधिकारी, श्री गणेश बिटोडे, यांनी तसेच सहायक आयुक्त, श्री प्रफुल शेळके, यांनी उपस्थित उमेदवारांना संबोधीत करून सदर योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह, यांनी सर्व हजर झालेल्या उमेदवारांचे स्वागत करून त्यांना शिस्त प्रिय अशा पोलीस विभागामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार असल्याने त्यांना सविस्तर मार्गदर्शन करून आवश्यक त्या सुचना दिल्या. मान्यवरांचे हस्ते पात्र उमेदवारांना रूजु आदेश देण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके व पथक तसेच प्र. पोलीस उपअधिक्षक (गृह) श्री विजय नाफडे यांनी मोलाचा सहभाग दिला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन पोहवा श्री गोपाल मुकुंदे यांनी केले.