
दिनांक ०७.०९.२०२४ पासुन अकोला जिल्हयात सर्वत्र श्री गणेश उत्सवास सुरवात होत असून संपुर्ण गणेश उत्सव कालावधीत शांतता व सुव्यवस्थेच्या वातावरणात साजरा होण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व उपाययोजना व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
नुकतेच अकोला जिल्हयात कावड उत्सव शांतता व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला असून नागरिकांनी कावड उत्सव दरम्यान पोलीस विभागाने केलेल्या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला, ज्यामुळे पोलीस व जनता यामध्ये उत्सव कालावधीत उत्तम समन्वय राहिला.
आगामी संपुर्ण श्री गणेश उत्सवा दरम्यान एकुण १६९८ गणेश मंडळांची स्थापना प्रस्तावित आहे. संपुर्ण उत्सव काळात जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे हेतु जिल्हा अस्थापनेवरील जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले असुन अधिक बंदोबस्तकरीता राज्य राखीव पोलीस बलाची ०१ कंपनी व ०१ प्लाटुन तसेच ८०० होमगार्ड सैनिक करण्यात आले आहे. तसेच श्री गणेश उत्सवा करीता महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथुन ०१ पोलीस उपअधीक्षक व १० पोलीस उपनिरीक्षक सुध्दा बंदोबस्ताकरीता प्राप्त होणार आहे.
शहरात उत्सवा दरम्यान भाविक आपली वाहने घेवुन श्री गणेशाचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यांचे गर्दीचे स्वरूप पाहता वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व नागरीकांचा असुविधा टाळणे हेतु पोलीसांकडुन उत्सव काळात आवश्यक त्या ठिकाणी वाहतुक वळविण्यात येणार आहे, नागरीकांनी कृपया या बाबीची नोंद घ्यावी.
उत्सवा दरम्यान गर्दी होणारे गणेश मंडळाचे ठिकाणी महिलांसोबत छेडखानी, चिडीमारी असे गैरप्रकार टाळण्यासाठी महिला पोलीसांचे दामिनी पथक नेमण्यात आले असुन ते नियीमत गर्दीच्या गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. जिल्हयात एकुण ६७३ गणेश मंडळाच्या ठिकाणी क्यु आर कोड लावण्यात येत असुन त्या ठिकाणी पोलीस नियीमत भेटी देवुन रकॅनींग करणार आहेत. उत्सवा दरम्यान गर्दीच्या ठिकाणचे कव्हरेज साठी सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावण्यात येणार आहेत, वरील सर्व माध्यमातुन पोलीसांची प्रत्येक घडामोडीवर तिक्ष्ण नजर असणार आहे.
अकोला पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन करण्यात येते की, श्री गणेश उत्सव शांततेत व सुव्यवस्थेच्या वातावरणात उत्सव साजरा करतांना सर्वधर्मसमभाव व सामाजीक ऐक्य अबाधीत राहील याची जाणीव ठेवुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.