अकोला जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२२-२३ मधिल रिक्त असलेल्या १९५ पदाकरीता भरती प्रक्रिया सुरू असून त्यापैकी १६८ उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व बारीत्र पडताळणीची प्रक्रीया पुर्ण झाल्याने त्यांना अकोला पोलीस घटकात पोलीस शिपाई पदावर रूजु होणे करीता आवश्यक त्या वापराच्या साहित्यासह संपूर्ण तयारीनीशी दिनांक ३१.०८.२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. मल्टीपर्पज हॉल, निमवाडी पोलीस वसाहत, अकोला येथे उपस्थित राहणे करता अकोला जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर यादी प्रसिध्द करून कळविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने १६८ उमेदवारांपैकी १५८ उमेदवार हे आज रोजी अकोला पोलीस घटकात हजर झाले. त्यांना रूजु करण्याचे अनुषंगाने कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मल्टीपर्पज हॉल, निमवाडी पोलीस वसाहत, अकोला येथे अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांनी संबोधीत केले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह, यांनी सर्व हजर झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा देऊन, सविस्तर मार्गदर्शन करून आवश्यक त्या सुचना दिल्या. उर्वरीत उमेदवार यांची वैद्यकीय तपासणी व चारीत्र पडताळणीची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येतील.



